Saturday, 3 September 2022

मिरा भाईंदर महानगरपालिकेचा शौचालय बांधणीत अजब निर्णय ! जितेंद्र आव्हाड यांची टिका !

मिरा भाईंदर महानगरपालिकेचा शौचालय बांधणीत अजब निर्णय ! जितेंद्र आव्हाड यांची टिका !


ठाणे, बातमीदार : मीरा- भाईंदर पालिका प्रशासनने चक्क शौचालय बांधण्यावरून जातीय भेद करत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकारावरून नागरिकांसह सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेच्या शौचालय  बांधण्याच्या कोटेशनच्या प्रस्तावामध्ये भाईंदर प्रभाग समिती १ मधील जैन समुदायासाठी शौचालय बांधण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शौचालय हे सर्वच नागरिकांसाठी सार्वजनिक असताना पालिकेच्या प्रस्तावात एका विशिष्ट समाजाचा जातीयवादी उल्लेख केला असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, मीरा भाईंदर महानगरपालिकेची ही शौचालय बांधणीची जाहीरात पहा. जैन बांधवांसाठी वेगळे शौचालय बांधण्याचा मनसुबा महानगरपालिकेने घातला आहे. माझा त्यांना रोकडा सवाल आहे की, हिंदु, मुस्लिम, शीख, बौद्ध, इसाई यांच्या साठी पण वेगळे शौचालय बांधणार का ? शौचालया धर्मानुसार बांधणारी एकमेव महापालिका असेल असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.. 


या प्रकारावर मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी हा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचे सांगत कुठल्याही समाजाच्या नावावर शौचालय बांधण्याच्या प्रस्तावाला पालिकेने मंजुरी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.


No comments:

Post a Comment

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट !

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट ! सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील प्...