वसई विरार महानगरपालिकेची अनधिकृत बांधकामावर कारवाई !
वसई, बातमीदार : वसई विरार शहर महापालिकेच्या प्रभाग समिती नालासोपारा येथील मोरेगाव परिसरात उभारण्यात आलेली दोन मजली इमारत आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निर्देशानुसार जमीनदोस्त करण्यात आली आहे.प्रभाग समिती बी मध्ये अनधिकृत इमारत उभारण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांना मिळाल्यानंतर जागेवर प्रत्यक्ष भेट दिली. त्यानंतर प्रभारी सहायक आयुक्त यांनी कर्मचाऱ्यांच्या व पोकलेनच्या सहाय्याने ३ हजार चौरस फूट बांधकाम असलेल्या या इमारत निष्कासित केली. कारवाईदरम्यान अतिक्रमण विभाग प्रमुख हरिश्चंद्र जाधव, अतिक्रमण विभागाचे अभियंता कुणाल घरत, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment