Saturday, 3 September 2022

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी आज घेतला विविध महापालिकांच्या कामाचा आढावा !

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी आज घेतला विविध महापालिकांच्या कामाचा आढावा !


कल्याण, बातमीदार : नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी आज महापालिका मुख्यालयात एका संयुक्त बैठकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या कामकाजाचा एकत्रित आढावा घेतला, यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, तीनही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, नगर विकास विभागाचे उपसचिव कैलास बधान, श्रीकांत आंडगे, अवर सचिव प्रतिभा पाटील तसेच महानगरपालिकेचा इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.


MMR region मधील प्रलंबित विषय प्रामुख्याने मार्गी लावण्यासाठी आजची आढावा बैठक घेतल्याचे प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सांगितले. सदर बैठकीत केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजना, शहर सौदर्यीकरण अभियान, महापालिकांचे राज्य शासनाकडे प्रलंबित असलेले विषय, उपाययोजना याबाबत प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे अमृत योजना -२, स्वच्छ भारत मिशन- २, पी एम स्वनिधी योजना, स्मार्ट सिटी प्रकल्प, कडोमपाची अमृत- 1 प्रकल्पाची सद्यस्थिती या विषयाबाबत एकंदरीत आढावा घेतला आणि अमृत -2 आणि SBM- 2 या प्रकल्पांचे डीपीआर प्राधान्याने सादर करणेबाबत कडोपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तदनंतर महानगरपालिकांनी आपापल्या विषयांचे सादरीकरण करून सद्यस्थितीबाबत व शासनाकडून अपेक्षित असलेल्या सहाय्याबाबत माहिती दिली.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...