आता गाय आणि म्हैशी मध्ये चर्म रोगाचा प्रादुर्भाव, दुधातून ही प्रसार,पाच जिल्ह्यात निष्पन्न, पशुपालकांमध्ये चिंता ?
कल्याण, (संजय कांबळे) : राज्यातील जळगाव, अकोले, पुणे, अहमदनगर आणि धुळे या पाच जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी स्क्रीन डिसीज अर्थात चर्म रोग या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले असून तो ठाणे जिल्ह्यात होऊ नये म्हणून पशुपालकांनी काळजी घेण्याचे अवाहन जिल्ह्यातील पशुसंवर्धन अधिका-यांनी केले आहे.
शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून पशुपालन केले जाते, गायी, म्हशी, शेळ्या, मेंड्या, बैल, डुकरे,आदी जनावरामुळे शेतकऱ्यांना मदत होते. दुग्धव्यवसायाबरोबरच, शेती आणि इतरही कामात त्यांना फायदा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही जनावरे म्हणजे कुंटूबांतील एक सदस्यच असतो. केवळ ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर शहापूर तालुक्यात ५९ हजार, भिवंडी मध्ये ५६ हजार, अंबरनाथ मध्ये १५/१६ हजार, कल्याण मध्ये १७ हजार ७९८ इतकी जनावरे म्हणजे जवळपास २ लाखाच्या आसपास जनावरे आहेत, कल्याणात, ३ हजार ५२१ गायी, ९ हजार १८३ म्हशी, ४ हजार ७८७ शेळ्या, १४० मेंढ्या आणि१६७ डुकरे यांचा समावेश आहे.
राज्यातील ५ जिल्ह्यात लम्पी स्क्रीन डिसीज अर्थात चर्म रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. या रोगाचा प्रसार मच्छर, गोचीड, माशा तसेच आजारी पशुच्या त्वचेवरील व्रणामधील, नाकामधील स्त्राव, याशिवाय दुध, लाळ व इतर स्त्रावामधून होतो.
या आजारामध्ये पशुना ताप येणे, शरीरावर १०/१५ मीमी व्यासाची कडक गाठी येणे, भूक कमी होणे, पायावर सूज येवून लंगडणे, जनावरे अशक्त होणे अशी लक्षणे दिसून येतात. परंतु बाधित जनावरांच्या वर वेळेवर औषध उपचार सुरू केले तर २/३ आठवड्यात हा आजार बरा होतो. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ह्या आजाराची लागण माणसांना होत नाही.
राज्यातील जळगाव, पुणे, अकोले, अहमदनगर, आणि धुळे आदी जिल्ह्यात या प्रादुर्भाव दिसून आला असला तरी ठाणे जिल्ह्यात याचा प्रसार होऊ नये म्हणून प्रत्येक तालुक्यातील पशुपालकांनी आपल्या गोठ्या मध्ये मच्छर, गोचीड, माशा यांच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी तसेच जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून आल्यास आप आपल्या तालुक्यातील पशुसंवर्धन अधिकां-याशी संपर्क साधावा असे अवाहन गटविकास अधिकारी यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment