भवानी चौक शाखेकडून सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांची सदिच्छा भेट !
कल्याण, बातमीदार : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 'ब' प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त पदी राजेश जी सावंत यांची नेमणूक करण्यात आली. महानगरपालिकेतील कार्यक्षम अधिकारी अशी राजेश सावंत यांची ओळख आहे. असे हे कार्यक्षम अधिकारी राजेश जी सावंत यांची 'ब' प्रभाग क्षेत्र अधिकारी (सहाय्यक आयुक्त) पदी नेमणूक झाल्याबद्दल शिवसेना भवानी चौक शाखेकडून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांची सदिच्छा भेट घेण्यात आली तसेच शुभेच्छा देऊन प्रभागाच्या विकासाची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विभाग प्रमुख सतीश वायचळ, उप शाखाप्रमुख संतोष जाधव, उप शाखाप्रमुख विशाल कांबळे, जेष्ठ कार्येकर्ते रवी मोरे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment