Friday, 2 September 2022

वसई विरार शहरात हेल्मेट सक्ती ! पोलीसांकडून कारवाई आणखी कडक करण्याचे संकेत !!

वसई विरार शहरात हेल्मेट सक्ती ! पोलीसांकडून कारवाई आणखी कडक करण्याचे संकेत !!


वसई, बातमीदार : दुचाकीस्वारांचे वाढते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वसई, विरार शहरांत १ सप्टेंबरपासून हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी वाहतूक पोलिसांनी विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दहा जणांवर कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड आकारला आहे.

वसई, विरार शहरात दिवसेंदिवस रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यात विशेषत: दुचाकीस्वारांचे अपघात होत असून यात डोक्याला दु:खापत होऊन गंभीर स्वरूपाचे अपघात घडत आहेत. अशा प्रकारे घडणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरात हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. यात पहिल्या कारवाईत पाचशे रुपये, तर दुसऱ्या कारवाईत पंधराशे रुपये दंड व परवाना रद्द करण्यात येणार आहे. तिसऱ्या कारवाईत गाडी जप्त करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास वसई वाहतूक विभाग परिमंडळ २ तर्फे वसई पूर्व पश्चिम, नालासोपारा पूर्व भागात पोलिसांनी दुचाकीवरून हेल्मेट परिधान करून रॅली काढली होती. यावेळी हेल्मेटचा वापर करावा याबाबत प्रबोधन करण्यात आले. याशिवाय ज्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले होते अशा दुचाकीस्वारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. 

शहरातील मुख्य रस्ते, महामार्गाला जोडणारे रस्ते, वर्दळीचे रस्ते अशा ठिकाणी कारवाईसाठी वाहतूक पोलिसांची पथके ठेवण्यात येतील. ही कारवाईची मोहीम हळूहळू अधिक तीव्र केली जाईल असे वाहतूक पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...