यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !
उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) :
सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर यांनी आपल्या पवित्र राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करुन त्यास मानवंदना दिली. त्यानंतर माध्यमिक विभागाच्या विदयार्थ्यांनी संगीत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भारतमातेला समर्पित असे जोशपूर्ण समूहगीत सादर केलं. आजच्या ह्या प्रजासत्ताक दिनी व्यासपीठावर यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर, उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, मानद सचिव ॲड. राजेंद्र भानुशाली, खजिनदार ॲड. अपूर्वा ठाकूर, सदस्य व माजी अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन, सिनिअर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. मिनाक्षी गुप्ता, स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या सिमरन दहिया, समन्वयक, सिनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख तसेच माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका, केंद्रप्रमुख श्री. शंकर म्हात्रे, पीटीए सदस्य, शिक्षकगण, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी तसेच हा सोहळा पाहण्यासाठी मोठया संख्येने पालक उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून पूर्व प्राथमिक ते ज्यु. कॉलेजच्या काही विदयार्थ्यांनी भाषणाद्वारे आपले मनोगत व्यक्त केले, तर यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर हयांनीही आपल्या भाषणाद्वारे सर्व उपस्थितांसमोर मौलिक विचार मांडले. त्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या विदयार्थ्यांनी पी.टी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नयनरम्य अशी प्रात्यक्षिक सादर केली, ज्यास उपस्थितांनी भरभरुन दाद दिली.
त्यानंतर परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विभागातील विदयार्थ्यांचा तसेच कला, क्रीडा व इतर विभागात विशेष कामगिरी करुन शाळा व कॉलेजचं नावलौकिक वाढवणाऱ्या विदयार्थ्यांचं उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर माध्यमिक विभागाच्या विदयार्थ्यांनी नयनरम्य अशी कवायत सादर केली .
सर्व कार्यक्रमाची तयारी, उपस्थितांचं स्वागत, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन यु. ई. एस. परिवारातील शिक्षकांनी सुत्रबध्द पध्दतीने केले. अशा रितीने यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा अत्यंत शिस्तबद्धपणे व दिमाखात पार पडला.
No comments:
Post a Comment