आनंद नगर मधील नागरी समस्या प्राधान्याने सोडवा शहर चिटणीस शेखर पाटील यांची मागणी !
उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील आनंदनगर मधील नागरी सुविधा बाबत उरण नगर परिषदेचे गटनेते अतुल ठाकूर यांच्यामार्फत नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांना शेतकरी कामगार पक्षाचे शहरचिटणीस शेखर पाटील यांनी निवेदन दिले.या निवेदनावर आनंद नगर मधील रहिवाशांनी १२७ जनाचे सह्यांचे निवेदन दिले आहे. त्यामध्ये आनंद नगर मध्ये गेले सात-आठ वर्षापासून पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे, गरजेपुरते देखील पाणी रहिवाशांना मिळत नाही, पाण्याचे प्रेशर अत्यल्प असल्यामुळे नियमित गरजा देखील भागत नाही. नागरिकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी यांना सातत्याने निवेदन भेटी देऊन देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही.यासंदर्भात आनंदनगर रहिवाशांच्या महिलांनी देखील नगरपालिकेकडे पाठपुरावा करून समस्या सुटल्या नाहीत. या प्रभागामध्ये रिडे व्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे पाण्याची जुनी लाईन बदलून त्या क्षमतेची नवीन पाईपलाईन आवश्यक आहे,नवीन गटारे बनवणे अत्यावश्यक आहे.त्याचबरोबर स्ट्रीट लाईटचे दिवे बसवावेत.आनंदनगर महालक्ष्मी सोसायटीमध्ये मागील काही महिन्यात चोरीची घटना घडलेली आहेत म्हणूनच स्ट्रीट लाईट बसवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आनंद नगर मध्ये सुशोभीकरणासाठी गेटवर कमान बांधणी व आनंद नगरच्या रहिवाशांसाठी गार्डनची व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. आनंद नगर ते राजपाल नाका या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे या बाबीकडे ही प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे. असे शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस व लिबर्टी पार्क गृहनिर्माण संस्था चे अध्यक्ष शेखर पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी गटनेते अतुल ठाकूर म्हणाले लिबर्टी पार्क आनंदनगरचे निवेदन समस्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांना देण्यात येऊन पाठपुरावा करून या समस्या सोडवण्यासाठी आग्रही राहू अशी ग्वाही दिली. यावेळी पत्रकार संघांचे अध्यक्ष घनश्याम कडू, ग्राहक संरक्षण कक्षाचे रमेश म्हात्रे, माजी नगरसेविका लता शेखर पाटील, उरण विधानसभा शहराध्यक्ष नयना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मंगेश कांबळे, शिवसेनेच्या कमल अशोक पाटील, शिवसेनेच्या विना तलरेजा, रसिका मिश्रा, शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष संजय गावंड, क्राइम ब्रांच असोसिएशनचे अध्यक्ष नारायण पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील, लिबर्टी पार्कचे सभासद व आनंद नगर वासीय उपस्थित होते
No comments:
Post a Comment