Tuesday, 27 January 2026

वसंत पंचमी उत्सव मंडळ (रजि.)ट्रस्ट उरण तर्फे सरस्वती महापूजा उत्साहात संपन्न !!

वसंत पंचमी उत्सव मंडळ (रजि.)ट्रस्ट उरण तर्फे सरस्वती महापूजा उत्साहात संपन्न !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : हिंदू धर्मात माता सरस्वतीला विद्येची,ज्ञानाची देवता म्हणून पूजले जाते.ज्ञानाची विद्येची उपासना करणारे भक्त माता सरस्वतीची मोठ्या भक्ती भावाने पूजा अर्जा करीत असतात.माता सरस्वतीची पूजा अर्चा भक्ती केल्याने विद्येची, ज्ञानाची प्राप्ती होते अशी भाविक भक्तांची श्रद्धा आहे. उरण मध्येही माता सरस्वतीची  मोठ्या प्रमाणात पूजा अर्चा भक्ती केली जाते वसंत पंचमी उत्सव मंडळ (रजि.)ट्रस्ट उरण तर्फे दरवर्षी सरस्वती महापूजेचे आयोजन उरण मध्ये करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विठ्ठल मंदिर, देऊळवाडी शहर शहर येथे सरस्वती महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता माँ सरस्वती देवी पूजा,दुपारी २ ते ४:३० या वेळेत कीर्तन व भजन, सायंकाळी ५ ते ७: ३० या वेळेत सुंदरकांड पाठ, सायंकाळी ७:३० वाजता महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. भाविक भक्तानी माता सरस्वतीचे दर्शन घेऊन विविध धार्मिक कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. 

एकंदरीत सर्वच कार्यक्रम मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादात संपन्न झाले. सदर उपक्रमाचे विविध धार्मिक कार्यक्रमाचे उत्तम व सुंदर असे आयोजन नियोजन करण्यात आल्याने सर्वांनीच या कार्यक्रमाचे कौतुक केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत पंचमी उत्सव मंडळ (रजि.) ट्रस्ट उरणचे अध्यक्ष दिनेश जयस्वाल, उपाध्यक्ष रंजनकुमार, महासचिव पि.टी. चव्हाण, सचिव दीपक मिश्रा, कोषाध्यक्ष मनोज शर्मा, सहसचिव अनिल कुमार, सहसचिव राम चव्हाण, संघटन मंत्री कामेश्वर शर्मा, संघटन मंत्री शास्त्री पंडित पांडे,संघटन मंत्री करण पाटील, सहसचिव रुपेश पाटील,सहसचिव राकेश रंजन यांच्यासह संरक्षक आशा पारेख, अमर श्रीवास्तव, पी एन सिंह, श्रीकृष्ण शर्मा, राजेश विश्वकर्मा यांच्यासह सर्व संरक्षक, वसंत पंचमी उत्सव मंडळ (रजि.) ट्रस्ट उरणचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...