कोकण - ( दिपक कारकर ) : चिपळूण तालुक्यातील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी, वहाळ संचलित न्यु इंग्लिश स्कूल, वीर विद्यालयातील विद्यार्थी कु. रसिक रमेश दुर्गोळी याने नुकत्याच पंचायत समिती, चिपळूण आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंधलेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. रसिक अभ्यासात अत्यंत हुशार,आणि तितकाच सांस्कृतिक क्षेत्रात देखील विविध कलागुणांनी भरगच्च भरलेला आहे. नमन कलेतील श्रीकृष्ण भूमिका, जाखडी नृत्य कलेत उत्तम नृत्य, मंगलाष्टके गीत/गायन कलेत रसिक अगदी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविताना दिसतो. तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत भरीव यश संपादन केल्याबद्दल रसिकचे विद्यालय व वीर ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदनासह कौतुक होत आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर व शिक्षक वृंद यांनी रसिकला सन्मानपत्र देऊन गौरविले. सांस्कृतिक/शैक्षणिक क्षेत्रात मी उत्तुंग भरारी घेईन असे रसिक याने प्रतिपादन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!
स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
माळशेज घाटातील रात्रीचा प्रवास जिवघेणा.... *** आम्ही नगरकरांच्या वतीने "रस्ता व दरीच्या संरक्षक भिंतीं"वर रिफ्लेक्टर (परावर्तक ) ल...
-
"करकरे साहेब क्षमस्व" मा.करकरे साहेब आणि शहिद साथी, आम्ही दिलगीर आहोत, निर्दयी आहोत, कृतघ्न आहोत, नालायक आहोत, पात्रता...

No comments:
Post a Comment