कल्याण तालुक्यातील कांबा, रेवती आणि गुरवलीपाडा येथे लम्पी सदृश्य जनावरे आढळून आल्याने पशुसंवर्धन विभाग सतर्क, तालुक्यासाठी तीन हजार लस प्राप्त !
कल्याण, (संजय कांबळे) : संपूर्ण राज्य शासनाची झोप उडविणा-या जनावरामधील 'लम्पी' या आजाराने ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, अंबरनाथ नंतर आता कल्याण तालुक्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न सुरू केला असून या आजाराची लक्षणे दिसून आल्याने तालुक्यातील कांबा, रेवती आणि गुरवलीपाडा येथील जनावराचे सँपल तपासणी साठी पाठविण्यात आले आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात लसीकरण मोहीम सुरू केली असून कल्याणसाठी सुमारे ३ हजार लस प्राप्त झाली आहे.
प्रारंभी राज्यातील जळगाव, अकोले, अहमदनगर, पुणे आणि धुळे जिल्ह्यात या लम्पी स्क्रीन डिसीज अर्थात चर्मरोग आढळून आला, परंतु हळूहळू तो संपूर्ण राज्यात पसरला, यामुळे हजारो जनावरांचा मृत्यू झाला. त्यामुळे अखेर शासनाने अशा पशुना क्वांरटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या आजाराचा प्रसार गोचीड, माशी, दुध आणि जनावरांच्या लाळेतून होत असल्याने याला ठाणे जिल्हा देखील अपवाद राहिला नाही.
जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात लम्पी च्या १५केसेस, भिंवडी ४, अंबरनाथ ४ मुरबाड अद्यापही एकही नाही, तर कल्याण मध्ये ३ संशयित आहेत.
या पाच तालुक्यातील पशुधनाची संख्या पाहता कल्याण १७ हजार ७९८, शहापूर ५९ हजार, भिवंडी ५६ हजार, अंबरनाथ १५/१६ हजार इतकी आहे, फक्त कल्याण तालुक्यात ३ हजार ५२१ गायी, ९ हजार ९८३ म्हशी, ४ हजार ७८७vशेळ्या, १४० मेंढ्या आणि १६७ डुकरे आदीचा समावेश आहे.
या आजारामध्ये पशुना ताप येणे, १०/१५ मीमी व्यासाची कडक गाठ येणे, भुक कमी होणे, पायावर सूज येवून लंगडणे, जनावरे अशक्त होणे अशी लक्षणे दिसून येतात. अशी जनावरे कल्याण तालुक्यातील कांबा,vरेवती आणि गुरवली पाडा येथे आढळून आल्याने या जनावरांचे सँपल पुढील तपासणी साठी पाठविण्यात आले आहेत, याचे रिपोर्ट अद्याप आले नाहीत, तरीही जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून या परिसरातील गावामध्ये लसीकरण मोहीम सुरू केली आहे. पशुसंवर्धन दवाखाना निबंवली अंतर्गत १७ गावे तर रायते पशु दवाखाना हद्दीतील ३० गावामध्ये प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू केली आहे. याकरिता कल्याण तालुक्यासाठी ३ हजार लस प्राप्त झाली आहे. शहापूर २ हजार ३००, भिंवडी २ हजार, अंबरनाथ २ हजारच्या आसपास लस मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांची टिम अगदी सुट्टीच्या दिवशी ही लसीकरण करत आहेत, त्यामुळे पशुपालकांनीही जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवून धूर फवारणी करावी, डास, मच्छर माशा याचा बंदोबस्त करावा असे सांगून हा आजार माणसांना होत नाही, त्यामुळे घाबरून जाऊ नये असे अवाहन पशुसंवर्धन अधिका-यांनी केले आहे.






No comments:
Post a Comment