Saturday, 17 September 2022

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, आयटक - ६८८५ शाखा, जळगाव तर्फे धरणे आंदोलन यशस्वी !!

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, आयटक - ६८८५ शाखा, जळगाव तर्फे धरणे आंदोलन यशस्वी !!

"अंगणवाडी कर्मचाऱ्याना पोषण आहार मास मध्ये आर्थिक व मानसिक त्रास"


जळगाव, प्रतिनिधी.. जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकतर्फे जिल्हा परिषद कार्यालयावर रोजी सकाळी१२ वाजता ते ३ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी जिल्हा परिषदेचे कार्य पालन अधिकारी श्री राऊत यांच्याशी खालील विषयांवर चर्चा झाली. असे अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. 

याबाबत सविस्तर असे की, अंगणवाडी
सेविकांना देण्यात आलेले मोबाईल निकामी झाले आहेत, त्यामुळे स्वतःचे मोबाईल वरून अंगणवाडी सेविका काम करीत आहेत. कामाच्या लोड मुळे ते मोबाईल देखील हळूहळू हॅग होत आहेत, सरकारने नवीन मोबाईल देण्यासाठी शंभर कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्यातून ताबडतोबिने प्रत्येक अंगणवाडी सेवीकेस दहा हजार रुपये मोबाईल खरेदीसाठी मिळावेत

मेहरबान उच्च न्यायालयाने पोषण ट्रॅक्टर संदर्भात महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊन मराठी मध्ये ॲप तयार करण्याच्या मागणीवर निर्णय घ्यावा असा आदेश दिलेला आहे. इंग्रजी मध्ये माहिती भरण्याची सक्ती करू नये अशा प्रकारे निर्देश दिलेले आहेत या निर्देशांचे जळगाव जिल्ह्यात उल्लंघन होत आहे. तसेच पोषण आहार सप्ताह रोज ३५/३५ फोटो काढून माहिती पुरवावी, अशी सक्ती केली जात आहे, त्यामुळे खाजगी मोबाईल सुद्धा होत आहेत म्हणून अंगणवाडी सेविकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष आहे.

तसेच जळगाव जिल्ह्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर सुमारे सहाशे ते आठशे जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांचा पदभार दुसऱ्या सेविकेला देण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांचेवर कामाचा लोड देखील वाढत आहे. त्या रिक्त जागा भरा तसेच त्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला मिळावा. तसेच गेल्या तीन वर्षापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढली पंचवीस हजार रुपये पगार द्यावा.

जळगाव जिल्ह्यात 2016/17 पासून सेवानिवृत्त झालेल्या सेविका मदतनिसांना सेवानिवृत्ती नंतरचा लाभ मिळालेला नाही. त्या वयोवृद्ध आणि जरा जर्जर असल्यामुळे त्यांना उदरनिर्वाह आणि औषधासाठी पैशांची अत्यंत आवश्यकता आहे. जिल्हा परिषद कार्यालयाकडून पाठपुरावा केला जात नाही. तो केला जावा बचत गट हे अंगणवाड्यांना मे महिन्यापासून पदरच्या खर्चातून खाऊ पुरवत आहेत त्यांचे चार महिन्याची बिल रखडलेले आहेत. 'ती मिळवण्यासाठी'
 
*जामनेर तालुक्यात प्रकल्प एक व प्रकल्प दोन अधिकाऱ्यांच्या संमतीने अंगणवाडी सेविकांकडून पोषण आहार सप्ताह मुलांना* *खेळण्या घेण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये जमा केले जात आहेत ज्या सेविका विरोध करतील त्यांच्या गावी टीम जाईल. त्यांच्यावर कारवाई होईल, ज्या मुख्य सेविका साथ देणार नाहीत त्यांना त्रास होईल धमक्या दिल्या जात आहेत, तसेच बँक पुस्तक अपडेट करण्यासाठी ही शंभर शंभर रुपये जमा करीत आहेत, या प्रकाराची चौकशी व्हावी* व त्यांचे पैसे जमा केलेले आहेत ते परत करावेत, त्याचे प्रमाणे पैसे जमा करताना तुम्ही कोरोना काळात फुकट पगार घेतला, आता हजार हजार रुपये द्यायला काय हरकत आहे, असा बेकायदेशीर युक्तिवाद केला जात आहे. *त्यामुळे सेविकांनी घाबरून पैसे जमा करणे सुरू केले आहे. या प्रकाराला शहापूर बीट मधून या प्रकाराला प्रतिरोध सुरू झाला आहे. तेथे एका सेविकेच्या मुलगा कॅन्सरने वारला त्या हजार रुपये देताना अक्षरशः थरथर करत होत्या*

*अशी बेकादेशीर वसुली करणाऱ्या संबंधित अधिकारी यांची हकालपट्टी व्हावी* आंदोलनात जामनेर प्रकल्प नंबर एक व नंबर दोन मध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी महिला असून महिलाच अंगणवाडी महिलांना अशा तऱ्हेने हजार हजार रुपये बेकायदेशीर मागून आर्थिक शोषण करीत आहेत, त्याबद्दल आंदोलनातील सर्व सेविका मदतनीस यांनी निषेध केला आहे, या मागण्याचे निवेदन जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण विभागाचे कार्यपालन अधिकारी श्री राऊत यांना देण्यात आले, त्यावर सविस्तर चर्चा केली असता श्री राऊत यांनी सांगितले की की पैसे गोळा करण्याचा प्रकार योग्य नाही त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. 

या तक्रारीची एक प्रत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिया पटेल यांनी देण्यात येणार आहे. आजच्या या तक्रारीच्या संदर्भात जामनेर तालुक्यातील आयटकच्या सर्व सेविका मदतनीस आंदोलनाला आवर्जून हजर होत्या. त्यांच्या सह्यांचे निवेदन त्यांनी सादर केले आहे. 

एक ऑक्टोबर पर्यंत मोबाईल संदर्भात व इतर बाबतीत निर्णय न घेतल्यास खाजगी मोबाईल वापरणे बंद करणार असा इशारा संघटनेने दिला आहे. असे संघटनेने काढलेल्या पत्रकात म्हटलेले आहे. 

या आंदोलनाचे नेतृत्व कामगार नेते कॉम्रेड अमृत महाजन, प्रेमलता पाटील, वत्सला पाटील, सुमित्रा बोरसे, शारदा पाटील, उषा सपकाळे, नुरुंनीसा हिफाजत अली, सुलेखा पाटील, ज्योती चौधरी, सुमित्रा सपकाळे, जिजाबाई राणे, सुनंदा पाटील, गुप्त्यार तडवी, लक्ष्मी तायडे, रमा इसाने यांनी केले. आंदोलनात चोपडा धरणगाव जळगाव भुसावल यावल जामनेर एरंडोल या ७ तालुक्यातून तीनशेच्या वर सेविका मदततीस बचत गट महिला उपस्थित होत्या..

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...