जव्हार- जितेंद्र मोरघा :
अनुसुचित जमातीच्या मुला/ मुलींना/लाभार्थ्यांना शिवणकाम / वेल्डींग प्रशिक्षण देणे या योजनेसाठी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार जि. पालघर अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा या चार तालुक्यातील अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रांसह या कार्यालयात दि. 20.09.2022 ते दि. 30.09.2022 या कालावधीत विहीत नमुन्यात अर्ज सादर करण्यात यावे. यापुर्वी सादर करण्यात आलेले अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. लाभार्थ्यांनी नवीनच अर्ज सादर करावे.
कागदपत्रांबाबत तपशिल
1) लाभार्थी हा अनुसुचित जमातीचाच असावा त्याच्याकडे स्वत:चा जातीचा दाखला असावा.
2) लाभार्थी इ. ८ वी पास असावा.
3) लाभार्थ्याने सदर योजनेचा लाभ यापुर्वी या कार्यालयाकडुन घेतलेला नसावा.
4) लाभार्थ्यांचा रहीवाशी दाखला असावा.
5) लाभार्थ्याचे आधारकार्ड व रेशनकार्ड च्या छायांकीत प्रती अर्जासोबत सादर कराव्या.
6) उपरोक्त अटी व शर्तींचे पुर्तता करणाऱ्या विधवा, परितक्त्या, कातकरी लाभार्थ्यांना योजना मंजुर करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.
7) अंतिम लाभार्थी निवडीबाबतचे व योजनेच्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार यांनी सर्व अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत.
8) विहीत नमुन्याचे लाभार्थी अर्ज कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
9) लाभार्थी शासन नियमानुसार प्रशिक्षण पुर्ण करणेस इच्छुक असावा.

No comments:
Post a Comment