सावकाऱ्यांच्या छळाला कंटाळून सहकार विभागाच्या अधिकाऱ्याची आत्महत्या !!
पुणे, बातमीदार : मुंबईतून पुण्याला बदली पाहिजे असल्याने अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी सावकारांकडून २० ते २५ टक्के व्याजदराने ८४ लाख ५० हजार रुपये कर्ज घेण्यात आले होते. सावकारांनी पैशांसाठी लावलेला तगादा आणि फसवणूक यामुळे सहकार विभागाच्या लेखाधिकाऱ्याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स इमारतीमध्ये घडली आहे.
गणेश शंकर शिंदे (वय ५२) असे आत्महत्या केलेल्या लेखाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शंकर लक्ष्मण गायकवाड, विजय सोनी आणि त्यांचे वडील, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीष हाजरा, पंधरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विजय सोनी, क्षीरसागर, साळुंखे आणि हाजरा यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment