Wednesday, 21 September 2022

मुंबईत शिवसेनेच्या गट प्रमुखांचा मेळावा संपन्न ! 'दसरा मेळावा" हा शिवतीर्थवरच होणार - उद्धव ठाकरे.

मुंबईत शिवसेनेच्या गट प्रमुखांचा मेळावा संपन्न ! 'दसरा मेळावा" हा शिवतीर्थवरच होणार - उद्धव ठाकरे.


भिवंडी, दि. २१, अरुण पाटील (कोपर) :
       आज मुंबईतीन गोरेगाव येथील नेस्को मैदानात शिवसेनेच्या गट प्रमुखांचा पदाधिकाऱ्यांच्या मेळावा संपन्न झाला. या सभेत माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धव ठाकरे म्हणाले की, ही ऐवढी गर्दी जमली आहे. तर दसऱ्याला किती गर्दी असेल. किती तरी पटीत असेल, आणि दसरा मेळावा हा आपल्या परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरच होणार आणि शिव तीर्थावरच घेणार असे ठणकावून सांगितले.
       सद्या मिंधे ( एकनाथ शिंदे ) गटाचे असे झाले आहे की, दिल्लीत मुजरा गल्लीत गोंधळ, हे किती वेळा वाकले असतील असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट व भाजपवर केला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंनी आज पहिल्यांदाच गोरेगावमधील नेस्को मैदानात शिवसेना गट प्रमुखांच्या मेळावा घेतला.या वेळी राज्यातील व देशातील गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश,व ईतर राज्यातील कार्यकर्ते हजर होते.या वेळी त्यांना स्टेजवर बोलवन्यात आले होते.
       बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटावर आणि भाजपवर टीकेचे तोफ डागली. मी मुले पळवणारी टोळी ऐकली होती, बाप पाळवणारी टोळी महाराष्ट्रात आहे असा टोला ठाकरे यांनी मारला. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ही ऐवढी गर्दी जमली आहे. तर दसऱ्याला किती गर्दी असेल.
      तसेच व्यासपीठावर आल्यावर मी एक-दोन गोष्टी बघितल्यात एक तर पहिली रिकामी खुर्ची पाहिली. संजय राऊत यांचा एक खुलासा करून टाकतो, नाही तर उद्या चौकट यायची की, संजय राऊत मींधे गटामध्ये गेले. नाहीतर सगळे मिंधेकडे गेलेले आहेत. पण संजय राऊत म्हणजे मोडेन पण वाकणार नाही. या निश्चयाने लढतायत, आणि या लढाई सोबत आहेत. तलवार हातात घेऊन आघाडीवर आहोत.
       उद्धव ठाकरे म्हणाले की, मला आश्चर्य वाटते की एवढी वर्ष तुम्ही आम्ही सगळ्यांनी यांना सत्तेचे दुध पाजले. आणि आता तोंडाची गटारे उघडली आहेत. जाऊ देत मला त्यांच्यावर बोलण्याची काही गरज नाही. तुम्ही सगळे त्यांना उत्तर देत आहात, असे सांगत शिवसैनिकांचे मनोबल वाढविले.
       मुंबईचे लचके तोडणारी गिधाडे फिरायला लागली आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत वाचत मोठे झाले आहोत. सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करताना अनेक शाह स्वराज्यावर चालून आले होते. मध्ये येऊन गेले त्या कुळातील आताचे शाह म्हणजे आताचे देशाचे गृहमंत्री ते म्हणाले शिवसेनेला जमीन दाखवा असे म्हणाले. इकडं असलेली गवताची पाती नाहीत तलवारीची पाती आहेत. गिधाडं हा शब्द जाणीवपूर्वक वापरला. मुंबईची निवडणूक आल्यानंतर तुम्ही येता, मुंबईवर संकट आल्यानंतर तुम्ही कुठं असता?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
       तसेच मुंबादेवी, ती आमची आई आहे. आईला गिळणारी औलाद सुद्धा आहे. या शिवसेनेने तुम्हाला मोठे केले. तुम्हाला पद दिली. येताना रस्त्यावर पाहत होतो सुरत २३२ कि.मी. किती लांब जावे लागले ढोकळा खायला, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांवर हल्लाबोल केला.
        कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय? मुंबईवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपचा कमळाबाई असा शब्दप्रयोग केला. कमळाबाई हा शब्द बाळासाहेबांचा आहे माझा नाही. ही तिच शिवसेना आहे, हे पाहिल्यानंतर पुन्हा मुंबईवर दावा करु नका. वंशवादावरुन आमच्या घराण्यावर टीका होते, पण तुमचा वंश कोणता, या वरुण तुमचा वाद आहे.
       या मुंबईवर वाकडी नजर पडली आहे त्यावेळच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत जनसंघ नव्हता. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती त्याच्या पहिल्या पाच अग्रणी होते त्यात माझे आजोबा-काका होते. मेलो तरी बेहत्तर मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे अशी स्थिती असताना निवडणुकीच्या वेळी जागा वाटपाचे नाटक करुन जनसंघ समिती फोडून बाहेर पडला. जनसंघ त्यातून बाहेर पडला. पण आपण दुर्देवाने त्यांच्या बरोबर युती केली.
        मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे संयुक्त महाराष्ट्राच्या समितीमध्ये माझे आजोबा शेलार मामा होते, आताचे शेलार नव्हे (आशिष शेलार यांना चिमटा) असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
        सगळी नालायक माणसं आपण जोपासली- सगळी नालायक माणसं आपण जोपासली, असा त्यांनी बंडखोर शिंदे गटाला टोला लगाविला आहे. तुमच्या वंश कोणता उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल केला. चित्ते आणल्यावरून ही उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले. दार उघडल्यावर चित्ता करतो म्याऊ म्याऊ असा टोला लगावला. शिवसेनेचा सर्वोच्च न्यायालयातील निकाल हा फक्त शिवसेनेचा नाही. तर देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही हा निकाल असणार आहे. कायद्यासमोर सगळे आहेत, हे आम्हाला कळू द्या. लोकशाही खरी आहे, हे कळू द्या. हे खोके सरकार पहिल्यांदा बाहेर या, मग बाहेर या.
       हिंदूमध्ये फूट करणे शक्य नाही मुस्लिम लोक देखील शिवसेनेसोबत आहेत. हिंदूमध्ये मराठी व अमराठी भेदभाव करा, ते शिवसेनेसोबत आहेत. कोरोनाच्या काळात कोणताही भेदभाव केला नाही. १९९३ च्या काळातही शिवसेनेने दर्ग्याचे रक्षण केले. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील देशातील सर्वच मुसलमान गद्दार आहेत, असे कधी म्हटले नाही. हिंदू मुसलमान अशी मराठीत फूट पडणे शक्य नाही. तुमचे चेल चपाटे असेल तर मुंबई महापालिका घेऊन दाखवा. त्याचवेळी विधानसभा निवडणूक घेऊन दाखवा. मस्ती आम्हाला पण येते, बघू कोण पाठीला माती लावते. शिवसेनेचे नगरसेवक जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. जा, आता निघून जा. शिवसेनेच्या आमदारांना हेच सांगितले होते. ज्यांनी इमान विकले आहे, ते किती वेळ ईमानदारीचा बुरखा घालणार आहेत? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुखांनी केला.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...