औरंगाबाद (खुलताबाद), अखलाख देशमुख : दि २६ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा' घोषित केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त ग्रामसेवक संघटना औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गाच्या वतीने व एल जी गायकवाड (मा. जिल्हा परीषद उपाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामीण भागातील सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व पदाधिकारी अशा ५०० रक्तदात्यांचा वतीने भव्य रक्तदान शिबिर भद्रा मारुती संस्थान खुलताबाद येथे आयोजित करण्यात आले होते.
योगायोग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त एकूण ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष प्रकाश वाकळे, पं.स. माजी सभापती गणेश नाना अधाने, पं.स. माजी उपसभापती दिनेश अंभोरे, नगरसेवक परसराम बारगळ, नगरसेवक योगेश बारगळ, ओबीसी तालुका अध्यक्ष गणेश झुरावात, अविनाश वेताळ, सुरेश जाधव, अजिनाथ जाधव, राजू चांदवडे, बबन वर्दे, गोटू मामा, उपसरपंच बा.सा. कारभारी नलावडे, मिरलाल सोनवणे, तुकाराम मालोदे,दादाराव मगरे, काकासाहेब जाधव, काकासाहेब गायकवाड,सर्व सरकारी कर्मचारी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व रक्तदाते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment