खोके सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन !!
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २४ : महाराष्ट्रात वाढलेले आत्महत्येचे प्रमाण त्याचप्रमाणे अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हैराण झाला असून सत्कार समारंभ आणि दिल्ली वारी करणाऱ्या असंवेदनशील शिंदे - फडणवीस खोके सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आज (२४ सप्टेंबर) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार कल्याण काळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही आंदोलन करण्यात आले.
"मिंधे सरकारचं करायचं काय खाली मुंडके वर पाय"
"पन्नास खोके एकदम ओके"
"नही चलेगी-नही चलेगी तानाशाही नही चलेगी"
"किसानो के सन्मान महाविकास आघाडी मैदान मे"
"मोदी - शहा हटाव देश बचाओ"
"हुकुमशाही नही चलेगी"
"शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे" घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की अतिवृष्टीने शेतकरी हतबल झाले आहेत जून महिन्याच्या कालावधीत समाधान कारक परिस्थिती होती. मात्र जुलै महिन्याच्या मध्यास अतिवृष्टी झाल्याने राज्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. उत्साहाने पेरणी केली मात्र नंतर झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून. महाराष्ट्रातील काही भागात तर अक्षरशः जमिनी वाहून गेल्या आहेत.
महाराष्ट्रातील वाढत्या आत्महत्येमागे प्रशासनासह सरकारचे धोरण जबाबदार आहे. शासनाच्या योजना शेतकर्यांपर्यंत पोहचत नाही असा आरोप यावेळी दानवे यांनी केला.
या संदर्भात खरेतर शेतक-यांच्या नुकसानीच्या सरकार मार्फत पंचनाम्याची आवयश्कता होती. परंतु सरकारने ठरावीक मंडळाचाच यात समावेश केला. याला कारण सर्व ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र नाही, परिणामी कित्येक शेतक-यांचे नुकसान होऊनही अद्यापही पंचनामे झालेले नाही. जालना औरंगाबाद व मराठवाडयातील अन्य जिल्हयात अतिवृष्टीमुळे मोसंबीवर बुरशी येऊन पिकांचे नुकसान झाले आहे. परंतु या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मदत देण्यात आलेली नाही.
या संदर्भात आम्ही वारंवार तात्काळ मदतीची मागणी केल्यानंतर सरकारने NDRF निकषानुसार २१ ऑगस्ट २०२२ रोजी मदतीची घोषणा केली. परंतु ही घोषणा होऊन अद्यापपर्यंत शेतक-यांच्या खात्यावर एक रुपयाही जमा झालेला नाही.
महाविकास आघाडीच्या अनेक पदाधिका-यांनी विरोधी पक्षनेत्यांनी बीड, जालना आदि जिल्ह्यांचा दौरा केला. काही ठिकाणी विविध सिंचन प्रकल्पातील पाण्याच्या विसर्गाच्या नियोजनामुळे सुद्धा कित्येक ठिकाणी शेतक-यांचे नुकसान झालेले आहे. या ठिकाणीही शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे.
सद्य परिस्थितीत मराठवाडयात पंचनाम्याच्या आधारावर अतिवृष्टीमुळे ७ लक्ष ३८ हजार ७५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच सततच्या पावसामुळे ४ लक्ष ३९ हजार ६२० हेक्टर शेती नुकसानग्रस्त झालेली आहे. या सर्व स्थितीत आपण त्वरीत शेतक-यांना मदत त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येवून शेतक-यांना लागवडीसाठी बीयाण्यांसाठी, सहज पतपुरवठा करावा, त्याचप्रमाणे शेतक-यांचा पिक विमा असताना ७२ तासात, शेतक-यांनी विमा कंपन्यास सुचना केलेल्या असताना एक ते दिड महिना होऊनही विमा कंपन्यांनी नुकसानाची दखल घेतलेली नाही.
अशी परिस्थिती असताना सरकारची कोणतीही मदत अद्याप त्यांना मिळालेली नाही. नुसत्या मोठमोठ्या घोषणा सरकार करते मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. झोपलेल्या या सरकारचे डोळे उघडण्यासाठी आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने हे आंदोलन करत आहोत. असे मत मा. विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.
यावेळी ना. अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय उपायुक्त सामान्य प्रशासन जगदीश मणियार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
याप्रसंगी आमदार उदयसिंह राजपूत,माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख राजू राठोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कल्याण काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील , संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड ,संजय सोमवंशी,माजी आमदार नामदेव पवार शिवसेनेचे विभागीय सचिव अशोक पटवर्धन, राष्ट्रवादीचे अभिषेक देशमुख, संजय ओताडे, संदीप बोरसे, अनुराग शिंदे, अनिल श्रीखंडे, राष्ट्रवादी पैठण तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण प्रधान,उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, कृष्णा डोणगावकर, अशोक शिंदे,अवचित वळवळे, अविनाश पाटील, लक्ष्मण भाऊ सांगळे, सुदर्शन अग्रवाल, शहर प्रमुख ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक राजू वैद्य ,गोपाळ कुलकर्णी, डॉ अण्णा शिंदे, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, राजू वरकड, दिनेश मुथा, सुभाष कानडे, मनोज पेरे, दिलीप मचे,संजय मोटे उपशहरप्रमुख वसंत शर्मा, प्रमोद ठेंगडे, संदेश कवडे, राजेंद्र दानवे, संतोष खेंडके, चंद्रकांत इंगळे, जयसिंग होलीये, रतन साबळे, बापू पवार, अंबादास मस्के, हरिभाऊ हिवाळे, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी मच्छिंद्र देवकर, माजी नगरसेवक मनोज गांगवे, कमलाकर जगताप, सचिन खैरे, मोहन मेघावाले, आत्माराम पवार, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव पाटील, कृष्णा राठोड,गणेश नवले प्राध्यापक संतोष बोर्डे, राजू वाकोडे, पुरुषोत्तम पानपट, विजय बंडू वाघचौरे, सुरेश गायके, रघुनाथ शिंदे, सोपान बांगर, विनोद सोनवणे, राहुल यल्दी, संतोष जाटवे, ज्ञानेश्वर शेळके, लक्ष्मण बताडे ,संजय कोरडे, दत्तात्रय निकम, कैलास तीवळकर, कांता पाटील, सिद्धार्थ वाघमारे, रामेश्वर मानकापे, अरुण गव्हाड, रामदास गायके, कृष्णा रिठे, शेख रब्बानी, दिनेश राजे भोसले, रवी ढगे, शिवाजी बचाटे, नितीन झरे, ज्ञानेश्वर मगरे ,विजय शिंदे, शिवाजी आपरे, काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष अनिल मालोदे, सलमान पटेल, कन्नड तालुकाप्रमुख शंकर ठोंबरे, उपतालुकाप्रमुख अशोक दाबके, संजय पिंपळे, गीताराम पवार, गंपू जाधव, मच्छिंद्र धाडगे, कारभारी दुबिले, सुरेंद्र सूर्यवंशी, गोकुळ तांगडे, बाळू शेळके, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, जयश्री लुंगारे, दुर्गा भाटी, आशाताई दातार, मीराताई देशपांडे, भागु अक्का शिरसाठ, नलिनी महाजन, मीना गायके, सुकन्या भोसले, मंजुषा नागरे, रेणुका जोशी सीमा गवळी, लता शंकरपाळ ,सुनीता पाटील, छायाताई जंगले, मेहराज पटेल, अंकिता विधाते, प्रतिभा वैद्य, हेमा पाटील, स्वाती चव्हाण, माधुरी खरात, कविता होळकर, वैशाली खोपडे, अरुणा लांडगे, सुहासिनी घोरपडे, दीक्षा पवार, दिपाली मिसाळ, बरखा विचुरे, अनिता भंडारी, स्वाती सरोदे, रंजना हिवराळे, रेखा राऊत, मंजुषा पवार आधी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment