Monday, 19 September 2022

अपुऱ्या आरोग्य सेवेला खड्डेमय रस्त्याचा ब्रेक, जनता त्रस्त सत्ताधारी मस्त ! जीव जातो गरीबांचा, सोपस्कार पंचनाम्याचा ?

अपुऱ्या आरोग्य सेवेला खड्डेमय रस्त्याचा ब्रेक, जनता त्रस्त सत्ताधारी मस्त ! जीव जातो गरीबांचा, सोपस्कार पंचनाम्याचा ?


कल्याण, (संजय कांबळे) : राज्यात कोवीड नंतर लम्पी ने धुमाकूळ घातला आहे, वर्षानुवर्षे रिक्त असलेली वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची पदे, रुग्णालयात असणाऱ्या गैरसोयी, रुग्णवाहिकांचा तुटवडा आणि यावरही मात करून एखाद्या पेंशटला पुढील उपचारासाठी न्यायचे असल्यास राज्यातील रस्ते आणि त्यावरील खड्डे? यामुळे 'बिचाऱ्या' रुग्णांचा जीव जातो ! या सर्वानी जनता भयानक त्रस्त आहे परंतु सत्ताधारी मात्र मस्त आहेत. असेच चित्र सध्या सर्वत्र पाह्यला मिळत आहे.


केवळ ठाणे आणि पालघर या जिल्ह्याचा विचार केला तर काही दिवसांपूर्वी रस्ता नसल्याने उपचारा अभावी आदिवासी जुळ्या मुलांचा जीव गेला, यानंतर पुन्हा महिलेची रस्त्यावर  जंगलात डिलीवरी झाली, एका १७ वर्षीय मुलीला आँक्शिजन न मिळ्याल्याने जीव गेला, कित्येकांना सर्पदंश झाला, परंतु वेळेवर रुग्णवाहिका, योग्य उपचार न मिळ्याल्याने जीव गेले, इतकेच काय तर आमदार विनायक मेटे यांच्या अपघातानंतर त्यांना कित्येक वेळ उपचार मिळाले नाही. ही भयानकता राज्यात आहे.


ठाणे जिल्ह्यातील फक्त कल्याण तालुक्यात  कोवीड १९ ने तब्बल २३५ मृत्यू झाले, यातील मदतीसाठी केवळ ३२ अर्ज भरण्यात आले, तालुक्यात पहिला डोस न घेणाऱ्याची संख्या मागील वर्षी सुमारे २२ हजार ५७८ इतकी आहे. तालुक्यात ४ प्राथमिक आरोग्य केंद्र होती, ती आता ३ वर आली आहेत. ग्रामीण भागात अंत्यत महत्त्वाचे असणारे ग्रामीण रुग्णालय गोवेली हे केवळ 'ट्रान्सपर, रुग्णालय झाले आहे. येथील २/३ रुग्णवाहिका भंगाराच्या दिशेने वाटचाल करत आहेत, केवळ एक रुग्णवाहिका नशिबाने मिळाली तर मिळते, अशीच काहीशी परिस्थिती अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी आणि शहापूर येथे दिसून येते.


यातूनही 'मानव सेवा हिच ईश्वर सेवा' असे समजून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पेशंट ला पुढे पाठविण्याचा प्रयत्न केला तर रस्ता आडवा येतोच?कारण राज्यात कुठेही गेलात तर खड्याविना रस्ता अशक्य !

अगदी वाडी वस्ती, पाडे, गाव, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका ते स्मार्ट सिटी असो खड्डे हमखास असणारच. त्यामुळे कसाबसा प्राथमिक उपचारादरम्यान जीव वाचलाच तर खड्यामुळे मात्र हमखास जाणारच? याचे कोणालाही सोयरसुतक नाही.

सत्ताधारी विरोधक, अमुक गट तमूक गट एकमेकांची उणीधुणी काढण्यात धन्यता मानत आहेत. आमदार, खासदार, मंत्री यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणारे जनतेच्या प्रश्नावर, त्यांच्या अडचणी, समस्या, महागाई,  बेरोजगारी यावर 'ब्र' काढायला तयार नाहीत. यावर त्यांचे वरीष्ठ देखील मूग गिळून गप्प आहेत. याचा अर्थ काय? पुरातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अन्न, वस्त्र, निवास, आणि आरोग्य, अशा मुलभूत सोईसुविधा मिळणार नसतील तर जनता त्रस्त आणि सत्ताधारी मस्त असेच म्हणावे लागेल !

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...