Monday, 19 September 2022

बंजारा मेळाव्या साठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार- डॉ. शंकर पवार

बंजारा मेळाव्या साठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार- डॉ. शंकर पवार


👉🏼ठाणे - दि. (मनिलाल शिंपी) 
       ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष समाजसेवक डॉ. शंकर पवार यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथे रविवार दिनांक १८/९/२०२२ रोजी बंजारा समाजाची आढावा बैठक मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाली. 
       या बैठकीत ठाणे, ढोकाळी येथील हायलँड ग्राउंड वर् रविवार दि. १६/१०/२०२२ रोजी भव्य बंजारा मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली, या भव्य मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस तसेच कॅबिनेट मंत्री मा. श्री. संजयभाऊ राठोड उपस्थित राहणार असून सोबत प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पंचायत राज्यमंत्री मा. श्री. कपिल पाटील व गुलबर्गा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार मा. डॉ. उमेश जाधव उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी सांगितले, तसेच ठाणे जिल्ह्याला पहिला मुख्यमंत्री लाभल्याबद्दल मा. श्री. एकनाथ शिंदे यांचे बंजारा समाजाच्या वतीने भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळा राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शंकर पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असून समस्त बंजारा समाजाच्या काही प्रमुख मागण्या मंत्री महोदयांसमोर मांडणार असल्याचे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर पवार यांनी यावेळी सांगितले.
         या आढावा बैठकीसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, बदलापूर, शिळफाटा, मीरा भायंदर, वसई-विरार या परिसरातील बंजारा समाजातील सर्व नायक, कारभारी, नेतेमंडळी, अशा अनेक मान्यवरानी उपस्थित राहून आपले मत व्यक्त केले आणि *बंजारा मेळावा* यशस्वी करण्यासाठी शपथ घेतली व मुंबई परिसरामध्ये बंजारा समाज एवढ्या मोठ्या संख्येने राहतो हे दाखवून देण्याची ही वेळ आली आहे म्हणून समस्त बंजारा समाज आपापले सह-कुटुंब सह-परिवार बंजारा वेशभुषे मध्ये एकत्रीत येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री. शंकर पवार यांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून समाजातील सर्व पदाधिकारी व नागरिकांना केले आहे.

*एक बंजारा, लाख बंजारा*
विशेष सूचना- बंजारा मेळाव्याची पुढील नियोजित सभा रविवार दि: २५/९/२०२२ रोजी दुपारी २:०० वाजता शंकर पवार यांच्या बंगल्या जवळ, वसंत विहार, पवार नगर, ठाणे (पश्चिम) येथे होणार आहे तरी सर्व समाजातील नागरिकांनी आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

No comments:

Post a Comment

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !!

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !! ठाणे (एस. एल. गुडेकर) : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा आणि सामाजिक...