Monday, 19 September 2022

रायगड जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या शासन दरबारी मांडणार - अनिल बोरनारे

रायगड  जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या शासन दरबारी मांडणार - अनिल बोरनारे

'रायगड जिल्ह्यातील शिक्षकांनी घेतली अनिल बोरनारे यांची भेट'


पनवेल, (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतरांच्या समस्या शासन दरबारी मांडून तातडीने सोडविण्यात येणार असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले.  

पनवेल येथे राज्यातील गुणवंत  शिक्षकांच्या एका गौरव सोहळ्यात आले असता रायगड जिल्ह्यातील अनेक शिक्षक- शिक्षकेतरांनी अनिल बोरनारे यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. रायगड  जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित असून तातडीने प्रश्न सोडविण्याबाबत बोरनारे यांनी शिक्षकांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या व त्यांच्यासमवेत चर्चा केली. या समस्यांबाबत रायगड चे शिक्षणाधिकारी, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यासमवेत चर्चा करून शिक्षकांचे प्रश्न सोडविले जातील. 

बंद झालेल्या शिक्षकांचे समायोजन, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव, ४० टक्के अनुदानास पात्र, मेडिकल बिले, पी एफ परतावा यासह अन्य सेवा शर्तीच्या प्रश्नांबाबत शिक्षकांनी बोरनारे यांच्याशी चर्चा केली.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...