भोर तालुका बौद्धजन संघ मुंबईचं कणखर नेतृत्व हरपलं संघटक सचिव- आनंद अडसूळ यांचे दुःखद निधन !!
[ ठाणे:-उदय दणदणे ] :
पिसावरे गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते तसेच "भोर तालुका बौद्धजन संघ मुंबई (रजि) या संस्थेचे संघटक व सचिव- आनंद गेनू अडसूळ यांचे शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी तालुका भोर मु. पिसावरे येथे तीव्र हृदयी विकाराने दुःखद निधन झाले.
स्वर्गीय आनंद अडसूळ दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी आपल्या मूळगावी पिसावरे येथे भोर येथील एका सामजिक संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.दरम्यान एक आठवडा ते गावी मुक्कामी होते.१७ सप्टेंबर २०२२ रोजी मुबंईला ते परतीचा प्रवास करणार होते मात्र त्याच दिवशी सायंकाळी ०७ च्या सुमारास तीव्र हृदयी विकाराने त्यांचं दुःख निधन होऊन आपल्या मायभूमी पिसावरे गावी अखेरचा श्वास घेतला.त्यांचे पार्थिव दादर मुबंई नायगाव येथील राहत्या घरी १८ सप्टेंबर रविवार रोजी पहाटे ०३ वाजता अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले. भोईवाडा मुबंई येथे सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनमिळाऊ स्वभावाचे अनेकांचे प्रमुख मार्गदर्शक, आधारस्तंभ राहिलेले स्वर्गीय.आनंद गेनू अडसूळ उच्चशिक्षित होते.सेल्स टॅक्स माझगाव मुबंई येथील कार्यालयात ते वरिष्ठ अधिकारी सेवेचा कार्यकाळ पूर्ण करून ते निवृत्त झाले होते.
सामाजिक कार्यात सदैव तत्पर राहिलेले स्व.आनंद गेनू अडसूळ आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नाने १५ ऑगस्ट २०१५ रोजी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून "भोर तालुका बौद्धजन संघ" मुबंई (रजि) या संस्थेची स्थापना करण्यात आले. संस्थेत पहिल्या फळीचे कार्यकर्ते होत संघटना वाढीसाठी संघटक म्हणून काम करत संघटनेच्या स्थापनेपासून आजवर ते सचिव पदाची धुरा सांभाळत होते.
आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई सारख्या शहरातील आपल्या समाज बांधवांना एकत्रित करून "भोर तालुका बौद्धजन संघ मुंबई (रजि) या संघटनेच्या जवळ जवळ ११ शाखा सुरू करून संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक तसेच शैक्षणिक, वधूवर मेळावे सारखे उपक्रम राबविण्यात ते नेहमीच अग्रेसर असायचे. सन. २०१८ मध्ये दामोदर नाट्यगृह मुबंई येथे संघटनेच्या वतीने स्नेहसंमेलन व संघटनेचे कार्यकाळ स्मरणिकेचे प्रति मनोरंजन कार्यक्रमाचे भव्य दिव्य असं आयोजन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. स्वर्गीय आनंद अडसूळ यांच्या आचनक जाण्याने संघटनेत न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार असून स्वर्गीय आनंद अडसूळ यांचा "पुण्यानुमोदन" रविवार दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी- १० वा. ललित कला भवन हॉल (लायब्ररी) नायगाव, दादर- पूर्व, मुंबई -१४ येथे होणार आहे. त्यांच्या दुःखात शोकाकुल समस्त अडसूळ परिवार (भावकी) पिसावरे गाव, भोर तालुका बौद्धजन संघ (मुंबई) सहभागी होत स्वर्गीय आनंद गेनू अडसूळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


No comments:
Post a Comment