Monday, 19 September 2022

कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान - युवा प्रेरणा कट्टा मार्फत आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक बाप्पा सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ! 'निकाल जाहीर'

कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान - युवा प्रेरणा कट्टा मार्फत आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक बाप्पा सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ! 'निकाल जाहीर'


दापोली, प्रतिनिधी : गणेशोत्सव 2022 च्या पार्श्वभूमीवर, दापोली मधील कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठानच्या युवा प्रेरणा कट्याने गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. विशेषतः या स्पर्धेसाठी, विषय म्हणून पर्यावरणपूरक स्वदेशी सजावटीला महत्व देण्यात आले. ही स्पर्धा खुली आणि ऑनलाइन पद्धतीने असल्याने महाराष्ट्रातील विविध भागांतून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

सांगली, पुणे, मुंबई, ठाणे, डोंबिवली, रत्नागिरी इ. अनेक शहरे आणि दापोली तालुक्यातील विविध गावांतील एकूण ७० जणांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, ही स्पर्धा पूर्ण विनामूल्य असून यामध्ये मूर्ती आणि आरास केल्याचे फोटो प्रतिष्ठानच्या संकेत स्थळावर माहिती सहित अपलोड करावयाचे होते. 

स्पर्धेचे परीक्षण दापोली मधील सुप्रसिद्ध कलाकार, श्री.विद्याधर ताम्हणकर आणि स्वप्निल शिंदे यांनी केले. मूर्ती शाडूची असण्या  बरोबरीने सजावट करताना वापरलेला सर्व वस्तू स्वदेशी आहेत का? त्या पर्यावरपूरक आहेत का? त्यातून कोणता सामाजिक संदेश दिला आहे का? अशा विविध मुद्यांचा आधार परिक्षकांनी घेतला.

या स्पर्धेचे परीक्षण करताना, सर्व स्पर्धकांनी मनापासून घेतलेल्या मेहनतीचे कौतुक स्पर्धेचे संयोजक प्रमोद पांगारकर यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनात युवा प्रेरणा कट्ट्याच्या सर्वच कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

*स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे*
प्रथम क्रमांक - संजय जगन्नाथ वर्तक (रत्नागिरी) ; द्वितीय - शीतल विठ्ठल कोळी(सांगली) ;
तृतीय (विभागून): कल्पेश विकास रेळेकर व अमित वसंत रेमजे ; उत्तेजनार्थ: अनिल लक्ष्मण गोताड(कोतवडे)

प्रतिष्ठानच्या वतीने, उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन केले असून या विजेत्यांची सजावट mahajantrust.in या संकेत स्थळावर उपलब्ध असल्याचे नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...