अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद व भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित !
डोंबिवली, प्रतिनिधी : देशाचे लाडके "पंतप्रधान मा. नरेंद्र भाई मोदी" यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंबिवली पश्चिम सम्राट चौक येथे 'अखिल भारतीय तेरापंत युवक परिषद' यांचे द्वारे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. आपले लाडके 'महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण साहेब' यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयात या भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आले. या पूर्ण कार्यक्रमाची देखरेख उपाध्यक्ष हरीश आनंद जावकर यांनी केली.
महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आपल्या कल्याण डोंबिवलीत सतरा ठिकाणी अमृत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भव्य रक्तदान शिबिराचा अनेक नागरिकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. तसेच या कार्यक्रमाप्रसंगीअखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद यांचे वतीने रक्तदाता यांचे आभार मानत सत्कार करून भेटवस्तू देण्यात आल्या, या कार्यक्रमाला मोठे सहकार्य करत भारतीय जनता पार्टीचे डोंबिवली शहर उपाध्यक्ष हरीश जावकर यांनी साथ दिली या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापित-दलपत जी इंडोदिया (महावीर युवा मंच), चेतन सिंघवी, अभिषेक इंडोदिया, पंकज पगारिया, हितेश हिरण, ऋषी गुंडेचा, आणि टायप टीम डोंबिवली आदींनी मेहनत घेतली तसेच "पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी" यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देण्यात आले. यावेळी आपले लाडके 'मंत्री रविंद्र चव्हाण' यांनी रक्तदान केलेला नागरिकांचे सत्कार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. आणि आपले लाडके "पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी" यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या.


No comments:
Post a Comment