Saturday, 24 September 2022

"२६ व्या विश्व अध्यात्मिक संमेलना"चा समारोप !!

"२६ व्या विश्व अध्यात्मिक संमेलना"चा समारोप !!

सावन कृपाल रुहानी मिशन तसेच मानव एकता संमेलनाचे अध्यक्ष संत राजिंदर सिंह जी महाराजांच्या सानिध्यात 20 सप्टेंबर, 2022 रोजी संत दर्शनसिंह धाम बुऱ्हाडी मध्ये संपन्न झाला.


संमेलनाच्या समारोप सत्रामध्ये हजारोंच्या संख्येने एकत्रित झालेल्या लोकांना संत रजिंदर सिंह जी महाराजांनी अध्यात्म, ध्यानाभ्यास आणि मानवी जीवनाच्या खऱ्या ध्येयाबद्दल सांगितले. त्यांनी असे म्हटले की, ध्यानाभ्यास केल्याने आपणांस अधिकाधिक भौतिक फायदे सुद्धा होतात, परंतु खऱ्या अर्थाने ध्यानाभ्यासाचे उद्देश्य केवळ स्वतःला जाणून घेणे आणि पिता-परमेश्वराला प्राप्त करणे हाच आहे. जेव्हा आपण ध्यानाभ्यास करतो तेव्हा आपण आपल्या अंतरी असे अनुभवतो की, आपण शरीर नसून एक आत्मा आहोत, जो पिता परमेश्वराचा अंश आहे. संमेलनाच्या समारोपा प्रसंगी संत राजिंदर सिंह जी महाराजांचा जन्मदिवस सुद्धा होता, जो संपूर्ण विश्वभरात "आंतरराष्ट्रीय ध्यानाभ्यास दिवस" म्हणून साजरा केला जातो.


संत राजिंदर सिंह जी महाराजांनी म्हटले की पिता-परमेश्वर सत, चित आणि आनंद आहेत. मानव असल्याकारणाने आपण सर्वजण त्यांना प्राप्त करू शकतो आणि आपल्या मानव जीवनाचे ध्येय पूर्ण करू शकतो. सत्य केवळ बाहेर नसून ते आपल्या अंतरी सुद्धा आहे. संत महापुरुष आपणास अध्यात्माच्या मार्गावर चालवितात आणि आपल्या आत्म्याला पिता-परमेश्वराची जोडण्यास मदत करतात. ते इच्छितात की, आपण सर्वांनी आपल्या अंतरी प्रभू प्रेमाचा अनुभव घ्यावा. जेणेकरून आपली पाऊले आपल्या जीवनाच्या ध्येयाकडे पडतील.


संत राजिंदर सिंहजी महाराजांनी जन्मदिनाचा खरा अर्थ समजाविताना म्हटले की, संत महापुरुषांच्या शिकवणुकीला आपल्या जीवनात उतरवून आपण सर्वानी स्वतःला अंतरातील प्रभूच्या ज्योती आणि श्रुतिशी जोडावे आणि 'आंतरिक जन्मदिन' साजरा करावा. याप्रसंगी आदरणीय माता रीटाजीं नी विदेशी बंधु-भगिनींबरोबर गुरुवाणील "लाल मेरे आये है" या शब्दाचे गायन केले.


जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अमृतानंद जी महाराजांनी संमेलनाच्या समारोप सत्रा मध्ये संबोधित करताना म्हटले की, संत राजिंदर सिंह जी महाराजांच्या अध्यात्मिक ऊर्जा आणि प्रेमाद्वारेच आपण ईश्वराला प्राप्त करू शकतो आणि ही शिकवण आपणांस अध्यात्माद्वारेच मिळते. भगवान आचार्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, संत राजिंदर सिंह जी महाराज आज संपूर्ण विश्वभरात ध्यानाभ्यासाच्या माध्यमातून युगपरिवर्तनाचा शंखनाद करीत आहेत. त्यांनी शिकवलेल्या ध्यानाभ्यासाची पद्धत आत्मसात करून संपूर्ण विश्व आपल्या अंतरी प्रभू प्रेमाचा अनुभव करीत आहे.


पूज्य श्री विवेक मुनी जी महाराजांनी संमेलनाच्या समारोप सत्रास संबोधित करताना म्हटले की, संत राजिंदर सिंह जी महाराजांद्वारे आयोजित अशा प्रकारच्या संमेलना मध्ये अध्यात्म, शांतीचा प्रवाह वहात आहे . ज्या द्वारे आपण केवळ बाह्यांगानेच नाही तर, आतूनही शांत होतो. ते आपणांस परमात्म्याशी जोडतात. यांना भेटल्याने आपल्या सर्वांचे जीवन धन्य झाले आहे.

महामंडलेश्वर स्वामी प्रेमानंद जी महाराज आपले विचार प्रगट करताना म्हटले की, संत राजिंदर सिंह जी महाराजांचा संदेश आपणांस अध्यात्माकडे प्रवृत्त करतो. हे आज संपूर्ण विश्वात अध्यात्माची शिकवण प्रसारित करीत आहेत कारण यांचा जन्मच पूर्ण मानव जातीच्या कल्याणाकरीता झाला आहे.

महामंडलेश्वर स्वामी देवेनंदानंद गिरीजी महाराज यांनी आपल्या संदेशात म्हटले की, प्रेम आणि अध्यात्मिकतेद्वारे संपूर्ण विश्वात शांति प्रस्थापित होऊ शकते आणि त्याची माहिती, आपणांस इथे आल्याने मिळते कारण असे प्रेममय आणि शांत वातावरण इतर कुठेही पाहायला मिळत नाही.

बेंटो रोडरिंग्स यांनी संमेलनात संबोधित करताना म्हटले की, या शरीरात आपल्या आत्म्या समवेत प्रभू सुद्धा वास्तव्य करतात, ज्याचा अनुभव आपण संत राजिंदर सिंह जी महाराजांच्या चरण कमली जाऊनच करू शकतो. संमेलनात अन्य विभिन्न धर्मातील धर्माचार्यं, विदेशी प्रतिनिधी आणि हजारो लोकांद्वारे एक प्रस्ताव मंजूर केला गेला की, आपण सर्वं विश्वभरातील लोकांनी संतांच्या शिकवणुकीचा मार्ग अनुसरून, ध्यानाभ्यास करून आणि निष्काम सेवेला आपल्या जीवनाचा अभिन्न अंग बनविण्यास प्रोत्साहित करेल तेव्हाच संपूर्ण विश्वास शांति स्थापन करण्याचे स्वप्न साकार होईल.

संमेलनाच्या समारोप सत्रात संत राजिंदर सिंह जी महाराजांच्या 'मनाचे शुद्धीकरण', अध्यात्मिक विज्ञान' आणि दयेचे पुष्प - भाग 5 या 3 नवीन पुस्तकांचे विमोचन आपल्या पावन करकमलांनी केले.

या प्रसंगी वस्त्र वितरण कार्यक्रमाच्या अंतर्गत गरजवंत मुलं, वयोवृद्धाना कपडे, पादत्राणे इत्यादींचे वितरण केले गेले. या व्यतिरिक्त अनेक समाज कल्याण संस्थांसारखे विशेषतः शांति अवेदन सदन, राजनगर, नवी दिल्ली मध्ये कॅन्सर पीडित बंधू-भगिनींना फळं, भाज्या आणि दैनिक जीवन उपयोगी वस्तूंचे वितरण सुद्धा केले गेले. याचबरोबर सफदरजंग इस्पितळात शारीरिक चिकित्सा आणि पुनर्वसन विभाग, मशिनरीज ऑफ चॅरिटी आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या व्यतिरिक्त अन्य समाज कल्याण संस्थांमध्ये सुद्धा रुग्णांना खाद्य सामग्रीचे वितरण केले गेले. संमेलनात विश्वाच्या अनेक देशांतून आलेल्या सुमारे 100 प्रतिनिधीं शिवाय भारतातून विभिन्न भागांतील लाखोंच्या संख्येने अनेक लोकांनी सहभाग घेतला.

जनसंपर्क अधिकारी, सावन कृपाल रुहानी मिशन,

अमृता : +91 84510 93275

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...