जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा जवाहर नवोदय विद्यालय कन्नड येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला सत्कार !!
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि. २४ : आज जवाहर नवोदय विद्यालय कन्नड येथे प्रादेशिक स्तरावरील तिरंदाजी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विद्यालयाला ६० संगणक, लाईट व रस्त्याची सोय करून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या पालकांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
खेळाडू वृत्ती विकसित करत देशाचे नाव उंचावा असे अवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य पंकज देशमुख, कन्नडचे उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वरकड, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment