औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २७ : वार्ड क्रमांक ११३ प्रभाग क्रमांक ३७ आनंदनगर येथे "मनसे" शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला... मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.. कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष आशिष सुरडकर यांच्या मार्गदर्शनात शहर उपाध्यक्ष शुभम बोराडे यांनी केले होते... याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, जिल्हाध्यक्ष वैभव मिटकर, , महानगर अध्यक्ष बिपीनजी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. महिला माता-भगिनींचा मोठा सहभाग शाखेच्या उद्घाटनप्रसंगी होता लवकरच प्रभागातील पाण्याच्या समस्येवर आंदोलन घेण्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले...
उपशहराध्यक्ष शेखर रणखांब पाटील, अमित जैस्वाल, विभाग अध्यक्ष प्रशांत आटोळे, प्रशांत इंगळे शहरसचिव सागर राजपूत, सोशल मीडिया सेलचे हेमंत जाधव, प्रशांत दहिवाडकर, शहर सचिव रामकृष्ण मोरे, चिन्मय कुलकर्णी आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.. यावेळी राहुल सुरडकर, हनुमान जाधव, अर्जुन मुळे यांची पदावर नियुक्ती करण्यात आली.. शुभम बोराडे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment