केंद्रस्तरीय शिक्षण परिषदे मुळे आपल्या विचारांची देवाण-घेवाण होते- डॉ.किशोर पाटील
"राहणाळ केंद्रातील १० शिक्षकांचा आदर्श गौरव पुरस्कार देऊन सन्मान"
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
भिवंडीतील जिल्हा परिषद शाळा कैलास नगर वळपाडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पुष्प ४ शाळा केंद्र राहणाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्व. अशोक बळीराम पाटील यांच्या स्मरणार्थ प्रथमच राहणाळ केंद्रातील शिक्षकांचा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार २०२२ व सर्व शिक्षकांना पेन व पॅड देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला,स्व.अशोक बळीराम पाटील यांच्या स्मरणार्थ कु.प्रितेश अशोक पाटील यांच्या वतीने शिक्षकांना आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार २०२२ देऊन गौरविण्यात आले,
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य श्री विकास अनंत भोईर, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील , वळ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उपसरपंच सौ राजूबाई बाळकृष्ण नाईक ,ग्रामपंचायत सदस्य श्री. रामनाथ रामचंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ. वनिता अनिल पाटील, ग्रामसेविका कु.श्वेता पाटील, माजी सदस्य श्री.संदीप पाटील, माजी सरपंच श्री.संजय पाटील, उद्योजक श्री.अरुण पाटील , समाजसेवक श्री. नाऊ पाटील, स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टचे सल्लागार श्री धनराज राठोड समाजसेवक श्री अनिल पाटील , कु. प्रितेश पाटील, राहणाळ केंद्र प्रमुख श्रीमती विजयश्री नरेश गवळी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. पुष्पलता गायकवाड मुख्याध्यापिका उच्च श्रेणी (अंजुर फाटा), केंद्र शाळेतील मुख्याध्यापक श्री.अजय लिंबाजी पाटील (राहणाळ), सौ.अनिला आकाश काबाडी (कालवार), श्री.राजेंद्र मारुती पाटील (डुंगे), सौ.विजया विलास घुगरे (कैलास नगर वळपाडा) सौ.पुष्पा परशुराम थोरात (ओवळी), सौ. चंद्रकला कैलास काबुकर (कारिवली), श्री.निलेश झगडे (वडघर), सौ. मनाली मोहन कानकेकर (ठाकराचापाडा), सौ.अर्चना अलंकार वारघडे साधन व्यक्ती (बी.आर.सी. भिवंडी), आदी मान्यवर, शिक्षक,शाळेय समितीचे प्रतिनिधी, व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते, कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नाही, ऑनलाईन मध्ये विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही, शिक्षण खरंतर शाळेतच मिळते, त्यामुळे सर्व शिक्षकांनी आपले विद्यार्थी शिक्षणात कसे पुढे जातील यासाठी लक्ष घालावे व सर्व शिक्षकांना आज या ठिकाणी आश्वासन देतो की स्थानिक पंचायत समिती सदस्य या नात्याने आपले कोणतेही काम असू द्या तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहीन असे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य श्री विकास भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले गेले परंतु सर्वच विद्यार्थी हे शिक्षण घेऊ शकले नाही, अशा कठीण परिस्थितीत आता विद्यार्थ्यांना शिकवणे शिक्षकांना जिगरीचे झाले आहे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले त्यामुळे ती भर काढणे आता सर्व शिक्षकांवर अवलंबून आहे, आज या ठिकाणी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करून सर्व शिक्षकांना एकत्र येण्याची संधी मिळाली आहे, तसेच या परिषदेमुळे प्रत्येकाच्या विचारांची देवाण-घेवाण होते त्यामुळे कोणाला काय अडचणी, समस्या आहेत त्या अडचणी, समस्या, कोणत्या प्रकारे दूर होतील.
यासाठी सर्व मिळून प्रयत्न करून सामोरे गेले पाहिजे हाच एक या परिषदेचा उद्देश आहे, त्यामुळे उपस्थित सर्व गुरुजनांचा आदर करून ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यामध्ये भेदभाव न करता आपणा सर्वांनाच सदर पुरस्कार मिळाला असे मानून मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो व आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो असे यावेळी दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, या परिषदेमध्ये उपस्थित सर्व शिक्षकांना स्नेह भोजनाची व्यवस्था माजी सदस्य संदीप पाटील यांनी केली होती तर् उद्योजक अरुण पाटील यांनी अकरा हजार रुपये रोख रक्कम कैलास नगर वळपाडा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षिका यांना त्यांच्या शुभहस्ते देण्यात आले ,
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पुष्प ४ मध्ये राहणाळ केंद्रातील प्रत्येक शाळेने विविध उपक्रम राबविले त्यामध्ये निपुन अंतर्गत FLM अहवाल केंद्र शाळा राहणाळ यांनी सादर केला, अध्ययन निष्पत्ती ई.६ ते ई.८ वी शाळा डुंगे, विज्ञान पेटी साहित्य ओळख शाळा कालवार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शाळा ओवळी, दिव्यांग प्रकार व अध्ययन शैली शाळा वडघर, विविध प्रकारच्या शासकीय योजनांची प्रशासकीय माहिती केंद्रप्रमुख श्रीमती विजयश्री गवळी यांनी यावेळी दिली, त्यामुळे केंद्रशरीय शिक्षण परिषदेला चांगले महत्त्व प्राप्त झाले, या परिषदेमध्ये आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार २०२२, अनघा अशोक दळवी जि.प. शाळा राहणाळ, रेश्मा विरेंद्र अर्थमाने जि.प. शाळा अंजुर फाटा, विशाखा विकास घाग जि.प. शाळा कैलास नगर वळपाडा, मनाली मोहन कानकेकर जि.प. शाळा ठाकराचापाडा, अशोक पंडित बेडसे जि.प. शाळा ओवळी, स्मिता शैलेश कायलोट जि.प. शाळा वडघर, अल्पना नितीन देशपांडे जि.प. शाळा कारिवली, विनोद आत्माराम निंबाळकर जि.प. शाळा डुंगे, अनिला अनिल काबाडी जि.प.षशाळा कालवार, शारदा गोपाळ वाहने जि.प. शाळा अंजुर फाटा, यांना देण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. पुष्पलता गायकवाड यांनी केले, तर सुत्रसंचालन अशोक बेडसे व आभार प्रदर्शन सौ. विजया घुगरे यांनी केले.

फारच छान सर
ReplyDelete