Monday, 26 September 2022

सारथीने २४९७ संशोधकांची ३९५ कोटी फेलोशीप मंजुर करत अग्रस्थान प्राप्त केले -राजेंद्र दाते पाटील

सारथीने २४९७ संशोधकांची ३९५ कोटी फेलोशीप मंजुर करत अग्रस्थान प्राप्त केले -राजेंद्र दाते पाटील


औरंगाबाद: मराठा- कुणबी समाजातील संशोधकां साठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व विकास संस्था अर्थात सारथीचे २५ जून २०१८ रोजी गठण केले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीची २९ डिसेंबर १९७८ रोजी स्थापना केली होती. पण बार्टीने २०१४ पासून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यास सुरुवात केली. ओबीसी, भटके-विमुक्त व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यां साठी ८ जून २०१९ रोजी महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योतीची निर्मिती झाली. महाज्योतीच्या तुलनेत सारथी फक्त एक वर्षाने जुनी आहे. तरीही सारथीने सामाजीक भान राखण्यात उच्च स्थान प्राप्त करत वर्ष २०१८- २०२१ पर्यंत १६९१ संशोधक छात्राना फेलीशीप दिली एका विद्यार्थ्यांस ११ लाख रुपये ३ वर्षांसाठी दिले जातात असे २९५ कोटी दिले असुन नुकतीच एक नवीन यादी २१ सप्टेंबर २०२२ रोजी जाहीर होऊन ८५६ संशोधक छात्र यांना छात्रवृत्ती रुपये ९६.७५ कोटी मंजुर केले असुन १६८१ अधिक ८५६ असे २४९७ संशोधकांना ३९५ कोटी मंजुर झाले असल्याची महत्वपुर्ण माहीती जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत विशेष बातचीत करतांना दिली.
 
पुढे बोलतांना ते अत्यंत सकारात्मक पणे बोलतांना म्हणाले की, महा ज्योतीला निधीची कमतरता असल्याचे सामोरे येते असुन २०१९ ते २०२२ पर्यंत फक्त ७५० जणांना ८०.५९ कोटींची फेलोशिप जाहीर झाली होती. त्यापैकी १९० जणांना संशोधन कालवधी संपत असताना फेलोशिप मिळाली. दरमहा २४ हजार रुपये प्रमाणे २४ महिन्यांचे फक्त ९.३१ कोटी रुपये मिळाले आहेत. उर्वरित ६६० जणांना ७१.२८ कोटींची फेलोशिप मंजूर झाली.

सारथीचे कार्यकारी संचालक अशोक काकडे (आय ए एस) यांचे अथक परिश्रम सोबत त्यांची प्रशासकीय- प्रकल्पीय टीम चे योगदान संचालक मंडळाचा अश्वासीत पाठिंबा मराठा क्रांती मोर्चाच्या अभ्यासक- समन्वयकांचा सातत्याने पाठ पुरावा या जोरावर सारथी प्रगती पथावर असुन आठवी ते दहावीच्या विद्यार्थी, युवकांना शिष्यवृत्ती, एमपीएससी, युपीएससी व तत्सम स्पर्धा परीक्षा तयारी त्यांची शिष्यवृत्ती आणि 

व्हिजन २०३० ची निर्मिती मराठा समाजाला प्रगती पथावर घेऊन जाणारा उपक्रम ठरणारा असुन विभागीय कार्यालये त्यातील प्रशिक्षण- विद्यार्थी वस्तीगृह निर्मीती यावर अधिक फोकस करण्याची गरजेचे अतिशय सुंदर व अभ्यासु विश्लेषण राजेंद्र दाते पाटील यांनी केले असुन संशोधक विद्यार्थी वर्गाला नोंदणी दिनांकापासून फेलोशीप देणे,निवड होताच लॅपटॉप देणे, दर महिन्याच्या सात तारखेच्या आत निश्चित दिवशी शिष्यवृत्ती संशोधकांच्या खात्यावर जमा करणे तसेच या बाबीवर गांभीर्याने सारथीने मंथन करून या टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या आमच्या मागण्यांवर विचार करावा असे नमुद करून राजेंद्र दाते पाटील म्हणाले की, त्यांनी एक सविस्तर पत्र मुख्यमंत्री कार्यालयास पाठवले असुन महिला संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी वयाची काही एक अट न ठेवता त्यांच्या संशोधन कार्यास मदत केली पाहीजे, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या सोबत पुढील वर्षाचे संशोधक विद्यार्थी निवड जाहीरात काढण्या पूर्वी कन्फर्मेशन लेटर वेळेत प्राप्त होण्यासाठी सर्व विद्यापीठांचा शिड्यूल्ड कॉम्बिनेशन सारथीने करून प्रोग्रेस रिपोर्ट सबमिशन- गाईड सोबत समन्वय या व इतर बाबी किमान पुढील वर्षाच्या नियोजनात अग्रक्रमाने घ्याव्यात आणि सारथीची कार्यक्षेत्र देशपातळीवर करावे सोबत डीम्ड युनिव्हर्सिटी विद्यार्थी वर्गाला सुद्धा संशोधन कार्या साठी विशेष योजना निश्चित करणे सुद्धा अत्यंत गरजेचे असल्याचे व तशी लेखी मागणी सुद्धा मुख्यमंत्री कार्यालया आणि सारथी संचालक मंडळा कडे केल्याचे प्रतिपादन जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी माध्यम प्रतिनिधी समोर विशेष बातचीत करतांना केले आहे.

अशीच एक बाब मंजुर करणे गरजेचे असुन सप्टेंबर २०१९ मध्ये जाहीरात निघाली होती परंतु कोरोना मुळे तब्बल २२ महिने मुलाखत व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत राहीले. सर्व कालखंडात सप्टेंबर २०१९ (२०२०) चे विद्यार्थी आधी छात्रवत्ती पासून वंचित राहिले त्यामुळे २०१९ ची उर्वरित (२०२०) विद्यार्थ्यांना जून२०१९च्या जाहीराती नुसार विद्यार्थ्यांना ज्या सोयी सुविधा सारथीने पुरवल्या त्या २०१९ उर्वरित(२०२०) जाहीराती तील विद्यार्थ्यांना देखील फायदा व्हावा तेव्हा कुठेतरी आर्थिक व सामाजिक उन्नतीचा न्याय दिल्या चे चित्र उभे राहील या बाबीवर गांभीर्याने सारथीने मंथन करून या टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या आमच्या मागण्यांवर विचार करावा असे नमुद करून अभ्यासक राजेंद्र दाते पाटील म्हणाले की,त्यांनी एक सविस्तर पत्र मुख्यमंत्री कार्यालयास पाठवले असुन महिला संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी वयाची काही एक अट न ठेवता त्यांच्या संशोधन कार्यास मदत केली पाहीजे, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या सोबत पुढील वर्षाचे संशोधकविद्यार्थी निवड जाहीरात काढण्या पूर्वी कन्फर्मेशन लेटर वेळेत प्राप्त होण्यासाठी सर्व विद्यापीठांचा शिड्यूल्ड कॉम्बिनेशन सारथीने करून प्रोग्रेस रिपोर्ट सबमिशन-गाईड सोबत समन्वय या व इतर बाबी किमान पुढील वर्षाच्या नियोजनात अग्रक्रमाने घ्याव्यात आणि सारथीची कार्यक्षेत्र देशपातळीवर करावे सोबत डीम्ड युनिव्हर्सिटी विद्यार्थी वर्गाला सुद्धा संशोधन कार्या साठी विशेष योजना निश्चित करणे सुद्धा अत्यंत गरजेचे असल्याचे व तशी लेखी मागणी सुद्धा मुख्यमंत्री कार्यालया आणि सारथी संचालक मंडळा कडे केल्याचे प्रतिपादन जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी माध्यम प्रतिनिधी समोर विशेष बातचीत करतांना केले आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...