औरंगाबाद (गंगापुर), अखलाख देशमुख, दि २६ : निजाम कालीन गुरु धानोरा ते मुर्शिदाबाद रस्त्यावर
मधोमध संबंधित व्यक्तीने अतिक्रमण केले असुन या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहे. या रस्त्यावर ग्रामस्थ स्वखर्चाने मुरूम टाकत आहे परंतु या रस्त्यावरील वहिवाट एका व्यक्तीमुळे थांबलेली आहे तो रस्ता दुरुस्त करून अतिक्रमण काढावे या मागणीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचे पालकांसोबत गंगापूर तहसील कार्यालयाच्या गेटवर शाळा भरऊन विद्यार्थ्यांनी दुपारचे जेवण केले.
गुरु धानोरा ते मुर्शिदाबाद हा निजाम कालीन नकाशाचा रस्ता असून या रस्त्यालगत गट क्रमांक ९०/९१ मधील एका शेतकऱ्याने अतिक्रमण करून गावकऱ्यासोबत शाळकरी विद्यार्थ्यांना वेठीत धरत आहे.मुर्शिदाबाद येथे सालाबाद प्रमाणे नवरात्र उत्सव साजरा होतो. या ठिकाणी पुरातन कालीन मंदिर आहे जिल्ह्यासह राज्यातील भाविक दर्शनासाठी येथे येत असतात परंतु रस्त्याची अशी दैनिय अवस्था झाल्यामुळे येथील शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त झाले आहे, वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलन करून याचा काही उपयोग झाला नाही म्हणून आज मुर्शिदाबाद धानोरा येथील विद्यार्थी नागरिक व महिला नवरात्र उत्सव सोडून तहसील कार्यालयाच्या गेटवर ठिय्या मांडून आंदोलनं करतं आहे. यावेळी ज्ञानेश्वर सुकासे, पोलीस पाटील सुभाष पाठे, संतोष म्हस्के, कैलास म्हस्के, शांतीलाल साळवे, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शेळके, रमेश पाठे, सदाशिव म्हस्के, शिवनाथ जाधव, श्रीधर म्हस्के, बाळू म्हस्के, भाऊसाहेब सुकासे, अंकुश म्हस्के, विठ्ठल म्हस्के सह शाळेतील विद्यार्थी गावातील महिला पुरुष यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. याप्रसंगी पो हे काँ व्ही.एस भिल्ल सह पोलीस कर्मचाऱ्यांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

No comments:
Post a Comment