Sunday, 2 October 2022

महाराष्ट्र सदनात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी !

महाराष्ट्र सदनात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी !


नवी दिल्ली, २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.  
 
            कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त (अ.का.) निलेश केदारे, निवासी अभियंता (स्थापत्य) जे.पी.गंगवार यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.  

No comments:

Post a Comment

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ; ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !!

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ;  ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !! ** १५ ते २० दिवसात पैसे डबल करण्याचे दाखविले जाते आमिष. ** वार...