Thursday, 27 October 2022

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली जालना जिल्ह्यात पाहणी !

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली जालना जिल्ह्यात पाहणी ! 


औरंगाबाद, अखलाख देशमुख, जालना दि २७ : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जालना जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे, नळणी गाव परिसरात शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी सहानुभूती पूर्वक संवाद साधून त्यांना धीर दिला.

    नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून तातडीने शासनास अहवाल सादर करावा असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.

       नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. नुकसानभरपाई बाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत लवकरच निर्णय घेतील असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

       यावेळी जिल्हा परिषद सदस्या आशाताई पांडे, जि. प. सदस्य डॉ. साबळे, बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भूषण शर्मा, अल्पसंख्याक आघाडीचे शेख नजीर, जिल्हा कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, तहसीलदार सारिका कदम , गटविकास अधिकारी श्री. सुरडकर, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, पं. स.तालूका कृषि अधिकारी राजेश तांगडे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

जेएनपीए विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पंचांग वर्ष 2025 दरम्यान 26.86% निर्यात-आयातमध्ये प्रमाणवाढ !!

जेएनपीए विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पंचांग वर्ष 2025 दरम्यान 26.86%  निर्यात-आयातमध्ये प्रमाणवाढ !! ** आर्थिक व्यापारगतीचे प्रतिबिंब ...