औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १० : आज विभागीय आयुक्त कार्यालयात राज्यातील पीक विम्याच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत पिक विमा पासून राज्यातील एकही बाधित शेतकरी वंचित राहिला नको यासंदर्भात बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना व विमा कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना अब्दुल सत्तार यांनी सूचना दिल्या.
आतापर्यंत किती शेतकऱ्यांचे अर्ज आले. त्यापैकी किती अर्ज तपासले. तसेच किती शेतकऱ्यांना आयएनएस मंजूर केला. यासंदर्भात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. तसेच प्रलंबित दावे पाच दिवसात निकाली काढून आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याचे आदेश यावेळी संबंधितांना मंत्री महोदय यांनी दिले. अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला.
बैठकीला औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयातून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव तसेच मंत्रालयातून कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे मुख्य संखिकी अधिकारी विजयकुमार आवटे, विभागीय व्यवस्थापक शकुंतला शेट्टी, गिरीजेश शर्मा, समीर सावंत, भरत कारभारी, एच. आर. गंगवाल तसेच कृषी विभागाचे प्रमुख अधिकारी व विमा कंपनीचे प्रमुख अधिकारी बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते.

No comments:
Post a Comment