Thursday, 10 November 2022

छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलच्या वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर !!

छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलच्या वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर !!

'मान्यवरांसह महापौरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती'


जळगाव, अखलाख देशमुख, दि १० : शहरातील दि जळगाव पीपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचलित ‘राजश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल जळगाव’ च्या 5 व्या वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवार, दि. 10 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व वंदन करून केले. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.सौ. विद्या गायकवाड, माजी महापौर तथा नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्यासह दि जळगाव पीपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टच्या वतीने चेअरमन प्रकाश चौबे, भालचंद्र पाटील, डॉ पी.एम.कोठारी सर,चंदन अत्तरदे हे व्यासपीठावर उपस्थित होते. या मोफत आरोग्य शिबीराच्या शुभारंभाप्रसंगी हॉस्पिटलमधील आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दि जळगाव पीपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचलित ‘राजेश्री, श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल जळगाव’ च्या 5 व्या वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर दि.10, 12, 14 व 16 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजिलेले असून सकाळी 10 ते दुपारी 2 अशी शिबिराची वेळ असणार आहे. यात नाक, कान, घसा, दंतरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग व जनरल तपासणी केली जाईल. तज्ज्ञ डॉक्टर्स कडून मार्गदर्शनही शिबीरात केले जाणार आहे. शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेत मोफत उपचार केले जातील, असे यावेळी.प्रकाश चौबे यांनी सांगितले. महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांचे स्वागत भालचंद्र पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी उपस्थितांना महापौर सौ.महाजन यांनी संबोधित ही केले.

No comments:

Post a Comment

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !!

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !! उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस...