औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १० : सा. औरंगाबाद युवा च्या १७ व्या वर्धापन दिना निमित्त सा. औरंगाबाद युवा व युवा शक्ती पत्रकार संघा तर्फे, सामाजिक व इतर क्षेत्रात भरीव कामगीरी करणाऱ्या व्यक्ती, संस्थाचा दरवर्षी प्रमाणे, युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. असेच बेचाळीस सामाजिक उपक्रम राबविणा-या सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद यांची यंदाचा युवा गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या विविध बेचाळीस उपक्रमात ज्यात प्रामुख्याने निराधार विप्पन्न अवस्थेत भटकणा-या मनोरुग्णांना शोधून त्यांची दाढी कटींग करुन स्वच्छ अंघोळ घालून व नविन कपडे देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची कामगिरी असो, अथवा बेवारस मृतदेहांची विनामुल्य अंत्यविधी, निराधारांसाठी वृद्धाश्रम, बेटी बचाव, स्रीभ्रुण हत्या प्रतिबंध, शासकीय रुग्णालयात मोफत औषधे, रक्त, अन्नदान, झाडेलावा झाडे जगवा अभियान, व्यसनमुक्ती अभियान, रक्तदान शिबीर, पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम, रुग्णसेवा असे अनेक उपक्रम सु-लक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या व माणूसकीच्या माध्यमातून समाजसेवक सुमित पंडीत व समाजसेविका सौ. पुजा पंडीत गेल्या ११ वर्षापासून सातत्याने राबवत आलेले आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक सामाजिक क्षेत्रात नेहमीच होत आलेले आहे. पुरस्कार जाहिर झाल्याचे पत्राद्वारे कळवीले आहे.
वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा निमित्त शानदार मुशायराचे आयोजन करण्यात आले आहे.
असे यावेळी संपादक अब्दुल कय्यूम आणि कार्यकारी मंडळा तर्फे सांगण्यात आले आहे.
१३ नोव्हेंबर २२ रविवारी संध्याकाळी ७ वाजता मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे सदर कार्यक्रम आयोजित केला आहे.
कार्यक्रमास वेळेवर सर्वांनी उपस्थित रहावे असे अवाहन अब्दुल कय्यूम अब्दुल रशिद यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment