जव्हार, जितेंद्र मोरघा :
मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळामधील मोठ्या प्रमाणावर शिक्षक पदे जवळपास मंजूर पदापैकी १५० प्राथमिक शाळांची पदे रिक्त आहेत बऱ्याच ठिकाणी इयत्ता १ ते ५ च्या शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहेत अशा परिस्थितीत तालुक्यातील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे, तसेच तातडीने भरती न झाल्यास किमान ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत निधीतून अथवा पेशा निधीतून ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समिती किंवा पेशा समितीमार्फत ग्रामपंचायत स्तरावर तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर गावातील सुरक्षित तरुणांची नेमणूक केल्यास स्थानिक पातळीवर शिक्षक उपलब्ध होतील जेणेकरून शिक्षकांची कमतरता कमी होऊन तालुक्यातील विद्यार्थी गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, त्यामुळे जिल्हा परिषद पालघर सदस्या कुसुम झोले यांनी जिल्हा परिषद पालघर अध्यक्षा वैदवी वाढाण, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, गट विकास अधिकारी मोखाडा, यांच्याकडे यांच्याकडे शिक्षक भरतीची मागणी केली आहे.

No comments:
Post a Comment