Monday, 7 November 2022

वृत्तपत्र लेखक : उदय दणदणे यांची कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती !

वृत्तपत्र लेखक : उदय दणदणे यांची कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती !


सामजिक, शैक्षणिक, कलाक्षेत्रात, विविध संस्थेवर कार्यरत असणारे गुहागर तालुक्यातील निवोशी गावचे सुपुत्र निर्भीड वृत्तपत्र लेखक तसेच पत्रकार -उदय गणपत दणदणे यांची शनिवार ५ नोव्हेंबर २०२२ रोजी मराठी रंगभूमी या सुवर्ण दिनी ५० वर्ष अधिक काळ कार्यरत असलेली लोककला व लोककलावंतांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असणारी कोकणातील अग्रगण्य मातृसंस्था *"कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुबंई-महाराष्ट्र राज्य"* संस्थेच्या "प्रसिद्धी प्रमुख" पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल पत्रकार उदय दणदणे यांनी सदर संस्थेचे सरचिटणीस- संतोष धारशे, अध्यक्ष -अनंत तांबे, चिटणीस- सुधाकर मास्कर , खजिनदार -सत्यवान यादव व सर्व सभासद, सदस्य यांचे आभार मानले असून पत्रकारितेच्या माध्यमातून संस्थेला परिपूर्ण प्रसिद्धी न्याय देण्याचा माझा निश्चित प्रयत्न असेल असे आश्वाशीत केले.

उदय दणदणे हे गेली २० वर्ष सातत्याने विविध दैनिक वृत्तपत्र लेखनातून तसेच आपल्या पत्रकारतेच्या माध्यमातून समाजातील विविध समस्या व जनतेच्या व्यथा निर्भीड पणे मांडत असून प्रसंगी अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. कलाप्रेमी व्यक्तिमत्त्व असलेले उदय दणदणे यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून कोकणातील नमन व जाखडी लोककला यांचा प्रसार प्रचार होण्याबरोबरच लोककलावतांचाही बहुमान उंचावण्यासाठी समाजात त्यांचा आदरतीर्थ सन्मान व्हावा प्रत्येक कलाकाराची व कलाकारांच्या सेवेतून कोकणची लोककला समृद्ध व्हावी, प्रसिद्धी व्हावी यासाठी ते जास्तीत जास्त प्रयत्नशील असतात.गेली दोन -तीन वर्षांपासून कोकणातील नमन लोककला व लोककलावंत यांच्या न्याय हक्कासाठी उदयास आलेली नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र अखंड भारत या संस्थेच्या प्रत्येक उपक्रमाची व कार्यसेवेची त्याचबरोबर कलावंतांच्या व्यथा आपल्या पत्रकारतेच्या माध्यमातून ठळकपणे मांडत आहेत.त्याची दखल कोकणातील लोकप्रतिनिधी यांना विधानसभेत मार्च २०२२ च्या अधिवेशनात घ्यावी लागली. आणि त्याचा तात्काळ पाठपुरावा करत नमन लोककला संस्थेचे अध्यक्ष -रविंद्र मटकर सचिव -सुधाकर मास्कर , यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील लोकप्रतिनिधी यांच्या बरोबर भेटी गाठी घेऊन सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी नमन लोककला संस्था यशस्वी झाली याचे त्यांना अधिक समाधान होत आहे. उदय दणदणे यांना नुकतच ०१ऑक्टोबर २०२२ रोजी विनोबा भावे ,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चरणस्पर्श लाभलेली "मुबंई सर्वोदय मंडळ" या ऐतिहासिक वास्तूत सरकार मान्यता प्राप्त मैत्री संस्था-मुबंई (महाराष्ट्र राज्य) वतीने त्यांच्या समाजिक पत्रकारिता सेवेची दखल घेत *"भारतीय संविधान सन्मान-२०२२* तसेच *सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रशिक्षण प्रमाणपत्र मा.सारीखा पाटील* (डीन-नायर हॉस्पिटल -मुबंई) व *मा.स्वप्नील वाडेकर* (लोकसत्ता पत्रकार- अध्यक्ष-नंदा फाउंडेशन ) मैत्री संस्थेचे अध्यक्ष मा.सूरज भोईर, सचिव-राजेश जाधव अशा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र व गौरव चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. अशा विविध पुरस्काराने सन्मानित होत वृत्तपत्र लेखक उदय दणदणे यांनी आपल्या कार्यसेवेची समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली असून "कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुबंई- महाराष्ट्र राज्य' मातृसंस्थेच्या "प्रसिद्धी प्रमुख पदी" वृत्तपत्र लेखक -उदय दणदणे यांची नियुक्ती झाल्याबद्दल कलाक्षेत्रात ,गुहागर तालुका सह सर्वस्तरातून अभिनंदन सह शुभेच्छा दिल्या जात आहेत.

शब्दांकन - गुरुदत्त वाकदेकर 

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...