Tuesday, 8 November 2022

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा विक्रोळी-घाटकोपर आणि संलग्न कुणबी युवा यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी समाज युवक -युवती यांच्यासाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबीरचे आयोजन !

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा विक्रोळी-घाटकोपर आणि संलग्न कुणबी युवा यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी समाज युवक -युवती यांच्यासाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबीरचे आयोजन !


मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
           कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा विक्रोळी-घाटकोपर आणि
संलग्न कुणबी युवा यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी समाज युवक -युवती यांच्यासाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबीर रविवार, दि.१३/११/२०२२ रोजी सकाळी १० वाजता गूरूकूल हॉल,रोड नंबर ६, पार्कसाईट, विक्रोळी पश्चिम, मुंबई - ४०००७९ येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात  प्रमुख मार्गदर्शक म्हणून  मा. रोहिदास दुसार  ( माजी असिस्टंट पोलीस कमिशनर व उप प्राचार्य ट्रेनिंग शाळा, खंडाळा ), श्री.रमेश घडवले (मा.सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई) उपस्थित रहाणार आहेत. शिवाय श्री. माधवजी कांबळे (अध्यक्ष-मध्यवर्ती कुणबी  युवा मंडळ),शाखा पदाधिकारी, महिला कार्यकारणी, युवक कार्यकारणी, विवाह मंडळ कार्यकारणी, सदस्य आणि सभासद यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अधिक माहीतीसाठी आजच श्री. सूरेश मांडवकर - 9833667560/ दिलीप कातकर - 8976709815/ मनिष वालम- 9769399296 यांच्यासी संपर्क साधावा. (येणाऱ्या प्रत्येक सदस्यांनी आपण येणार असल्याची नोंद संबंधितांना द्यावी) तरी समाजातील युवक -युवती यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कुणबी युवा विक्रोळी-घाटकोपर प्रचार-प्रसार टिमने केले आहे.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...