अंधेरी पुर्व विधानसभेवर ऋतुजाताई लटके यांचा दणदणीत विजयी झाल्याबद्दल म्हारळ मध्ये जल्लोष !
कल्याण, (संंजय कांबळे) : माजी आमदार कै, रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार श्रीमती ऋतुजाताई रमेश लटके यांचा सुमारे ६० हजाराहून अधिक मतांनी दणदणीत विजय झाल्याने याचा जल्लोष म्हारळ शिवसेना शहर शाखेच्या वतीने फटाक्यांच्या आतीषबाजीने व पेढे वाटून करण्यात आला, यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपाच्या कुटनिती व फोडाफोडी राजकारणाचा शिंदे गटाचे ४० आमदार बळी पडले, गद्दार हा कायमस्वरूपी शिक्का त्यांच्या वर मारला गेला, या गद्दारी मुळे सर्व सामान्य जनता व शिवसैनिक कमालीचा दुखायला गेला, ऐवढ्यावरच न थांबता शिंदे गटाने कट्टर शिवसेना पदाधिकाऱ्यांना साम, दाम, दंड, भेद अशा आयुधांंचा वापर करून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला, यावरही जे ऐकले नाहीत, त्यांना तडीपार करण्यापर्यत मजल गेली, धनुष्यबाण गोठवणे, पक्षावर दावा सांगणे, असे अनेक अडथळे निर्माण करण्यात आले, इतकेच नव्हे तर माजी आमदार कै. रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या पदाच्या उमेदवार ऋतुजाताई लटके यांना राजीनाम्यासाठी कोर्टात जावे लागले, भाजपाने अगोदर उमेदवारी अर्ज भरला व नंतर परभवाची चाहूल लागताच तो मागे घेतला, या सर्व घाणेरड्या राजकारणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सहानुभुती दिवसेंदिवस वाढत राहिली.
भाजपाने अंधेरी पुर्व निवडणूकीतून उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी नोटा चा वापर करण्याचे अवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले, असे आरोप शिवसेना नेते अनिल परबासह अनेकांनी केली, यानिवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या उमेदवार ऋतुजाताई लटके या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत होत्या, त्यामुळे सर्वाचीच प्रतिष्ठा पणाला लागली होती.
अपेक्षेप्रमाणे श्रीमती लटके यांना सुमारे ६०/६५ हजाराच्या आसपास मते मिळाली व त्यांचा दणदणीत विजय झाला, हा विजय उध्दव ठाकरे सह कट्टर शिवसैनिकांसाठी नव्या उमेद घेऊन येणारा ठरला, त्यामुळे याचा जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात आला.
कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या म्हारळ गावात शिवसेना शहर शाखा म्हारळ च्या वतीने विजयी उमेदवार ऋतुजाताई लटके विजयाचा जल्लोष करण्यात आला, यावेळी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली, यावेळी उध्दव ठाकरे झिंदाबाद, आदित्य ठाकरे झिंदाबाद, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला, याप्रसंगी म्हारळ शहर प्रमुख प्रकाश चौधरी, देवानंद म्हात्रे, सुनील पवार, यशवंत देशमुख, मुकेश अहिरे, नितीन शिर्के, योगेश गंलाडे, सोमनाथ भोईर, राजेश दुबे, नाथा पालवी, दिनेश भोपो,विजय गायकवाड, अक्षय सकपाळ, अरविंद झेंडे, सचिन जाधव आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment