Friday, 4 November 2022

मुंबई अग्निशमन दलाचे नवनियुक्त 'प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री.संजयजी मांजरेकर' यांचा जागतिक मानवाधिकार ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी आणि छत्रपती मराठा साम्राज्यतर्फे सत्कार !

मुंबई अग्निशमन दलाचे नवनियुक्त 'प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री.संजयजी मांजरेकर' यांचा जागतिक मानवाधिकार ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी आणि छत्रपती मराठा साम्राज्यतर्फे सत्कार !


मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
               जागतिक मानवाधिकार ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी आणि छत्रपती मराठा साम्राज्य( CMS) संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जगभरात नावलौकिक असलेल्या मुंबई अग्निशमन दलाचे नवनियुक्त प्रमुख अग्निशमन अधिकारी (CFO) म्हणून श्री.संजयजी मांजरेकर यांची नेमणुक झाल्याबद्दल मुंबईचे मा.महापौर श्री.महादेव देवळे यांच्याहस्ते जागतिक मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (शुक्रवार )भायखळा अग्निशामक केंद्र येथे शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सत्कारासह शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी AIACPC चे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.अमोल वंजारे, महा. महिला सचिव सौ.ज्योतीताई भोसले, WHRAF मुंबई उपाध्यक्ष श्री. महेश सरफरे, मुंबई म. सचिव सौ.ऋतिका पंदूगडे, छत्रपती मराठा साम्राज्य (CMS) चे मुंबई ठाणे एडमिन श्री.प्रमोद साळोखे, मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेचे कार्याध्यक्ष,दुय्यम अग्निशमन अधिकारी श्री.शरद कुवेसकर व खजिनदार श्री.दामोदर पांडकर, AIACPC चे मुंबई सचिव श्री.हितेश गायकवाड, श्री.दत्तराज आंब्रे, श्री.लीतेश केरकर, घाट. सचिव श्री.प्रकाश आंब्रे व इतर पदाधिकारी , अग्निशमन दलातील अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...