जळगाव, अखलाख देशमुख, एरंडोल दि ४ : महाराष्ट्रात उद्भवलेली भीषण परिस्थिती आणि शासनाच्या उदासीनतेच्या पार्श्वभूमीवर एरंडोल-पारोळा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा. ना. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले...
यावेळी १) शेतकरी कर्जमाफी, २) मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करणे ३) आणेवारी ५०पैसे च्या आत करणे, ४) पीक विम्याचे पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे अशा विविध शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार सुचिता चव्हाण यांना देण्यात आले... सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले...
यावेळी उपस्थित व शिवसैनिकांनी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली...
यावेळी बोलतांना विरोधी पक्षनेते मा.ना.अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारवर कडाडून टीका केली. हे सरकार शेतकरी हिताचं नसून स्वार्थासाठी अस्तिवात आले आहे. एकीकडे राज्यातले महत्वपूर्ण प्रकल्प दिवसागणिक जात आहेत, आणि मुख्यमंत्री उत्सवात मग्न आहेत. कोणताही निर्णय घेण्यासाठी दिल्लीश्वरांच्या आदेशाची वाट बघावी लागते, शेतकरी भीषण संकटात सापडला असतांना असून हे शासन अजूनही बांधावर पोहोचले नाही, अतिवृष्टीमुळे पिकांची झालेल्या नुकसानाचे पंचनामे नाहीत. शासन कुंभकर्णी झोप घोरत आहे त्यांना जागे करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले...
यावेळी सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र पाटील, जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, महिला जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, जळगाव चे उपमहापौर कुलभूषण पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, उपजिल्हासंघटक किशोर निंबाळकर, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, पारोळा तालुकाप्रमुख आर.बी.पाटील, जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, माजी जि.प.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, उपतालुकाप्रमुख रविंद्र चौधरी, उपतालुकाप्रमुख संजय पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख विवेक पाटील,युवासेना उपजिल्हाप्रमुख पराग गुंजाळ, जिल्हासमन्वयक अतुल महाजन, एरंडोल शहरप्रमुख कुणाल महाजन, पारोळा शहरप्रमुख अशोक मराठे, युवासेना जिल्हाचिटणीस आबा महाजन, युवासेना तालुकाप्रमुख गुलाबसिंग राजपूत, पारोळा युवासेना तालुकाप्रमुख रविंद्र पाटील, युवासेना शहरप्रमुख प्रमोद महाजन, नगरसेविका दर्शना ठाकूर, माजी नगरसेवक सुभाष मराठे, नितीन बिर्ला, रुपेश माळी, सुनील मराठे, परेश बिर्ला,संदीप बोढरे, गोविंदा राठोड, महेश महाजन, नितीन महाजन, सावन शिंपी, भुषण भोई, अमोल भावसार, कुणाल पाटील, देवेन पाटील, रवी पवार, शाम कानडे, बाळा राजपूत, सुनील चौधरी, ज्ञानेश्वर बडगुजर, राजेंद्र ठाकूर, अमोल भोई, भरत चौधरी, दादाभाऊ पाटील, ऋषी शिंपी, जयेश महाजन, राजेश महाजन, पवन महाजन, विक्की पाटील,पंकज पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते...

No comments:
Post a Comment