'महापौर सेवा कक्ष कामा'ची 'शिवसेना उपनेत्या प्रा. सौ. सुषमा अंधारे' यांनी केली तारीफ !!
जळगाव, अखलाख देशमुख, दि ०४ : लोकमत व महापौर सेवा कक्ष यांच्या सौजन्याने जळगाव, धुळे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांना शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी जळगाव येथे हॉटेल प्रेसिडेंट याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास शिवसेनेच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे, संपर्क प्रमुख श्री. संजय सावंत, शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ. जयश्री सुनिल महाजन, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डाॅ श्री. उल्हास पाटील, मनपा विरोधी पक्षनेते श्री. सुनिल महाजन, लोकमतचे सहायक महाव्यवस्थापक श्री. गौरवजी रस्तोगी, हे अतिथी व्यासपीठावर उपस्थित होते.
महापौर असलेल्या महिलेने महापौर सेवा कक्ष स्थापन करून समस्या जाणून घेण्यासाठी नागरिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, महापौर सौ. जयश्री महाजन या सेवा कक्षातून जनतेच्या भावना जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे, या उपक्रमातून तर दिसते आहे पण समाजा विषयी त्यांची तळमळ देखील दिसते, असे सांगत प्रा. अंधारे यांनी महापौर यांच्या कामाची स्तुती करून त्यांच्या भाषणातून गौरवोद्गार काढले.

No comments:
Post a Comment