Friday, 4 November 2022

वाहतुक विभागातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे वसई-विरार, नालासोपारा परिसरात वाहतुक समस्या !

वाहतुक विभागातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे वसई-विरार, नालासोपारा परिसरात वाहतुक समस्या !  

वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचारी संख्याबळ वाढवणे महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी - रूचिता अमित नाईक, अध्यक्षा कॉंग्रेस समेळगाव
 

वसई, प्रतिनिधी :
         वसई- विरार महापालिका क्षेत्रात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यानुसार येथे वाहतुक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतुक पोलिसांची गरज आहे. वसई तालुक्यात वाहतुक पोलिसांचे संख्याबळ वाढवल्यास वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे सोयीस्कर होईल.


वसई विरार या शहरामधील वाहतुक कोंडीचा प्रश्न नेहमी सतावत असतो याठिकाणावरील महत्वाचे रस्ते अनधिकृत फेरीवाल्यांनी वाढवल्यामुळे परिसरातील रस्ता अरूंद असल्याने येथिल नागरीकांना वाहतुक कोंडीचा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे याभागात वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.

अनेक महत्वाचा ठिकाणी पोलिस गायब असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या वाहनांनी किंवा इतर कोणत्याही कारणाने वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी देखील पोलिस चौकाचौकांत हजर राहत नसल्याची सद्यःस्थिती आहे.

वाहतूक नियमनाऐवजी पोलिस दंडात्मक कारवाईवर भर देत असल्याचे प्रकार समोर येत आहे.......

कोंडी झाल्यानंतर वाहतुकीचा वेग मंदावतो व ती सोडविण्यासाठी त्वरित पोलिस उपलब्ध नसतात.
तसेच पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी एकाच ठिकाणावरून जावे लागत असल्याने ट्रॅफिक समस्या वाढत आहे. काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा नसल्याने सर्व भार वाहतुक पोलिसांवरच पडत आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण कमी होण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि दळणवळणाचा वेग वाढविण्यासाठी या ठिकाणी वाहतुक पोलिसांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. 

संख्याबळ कमी असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर भार पडत आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांना रजा न मिळणे, डबल ड्युटी करावी लागणे असे प्रकार घडत आहेत. कमी कर्मचाऱ्यांमुळे गस्त घालतांनाही अडचणी होत आहेत. त्यामुळे या बाबींकडे लक्ष देऊन वाहतुक पोलीस शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी तसेच महत्वाचा ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवावी अशी मागणी *रूचिता अमित नाईक अध्यक्षा कॉंग्रेस समेळगाव* यांनी पोलीस आयुक्त सदानंद दाते साहेब यांच्याकडे केली आहे

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...