'लोकप्रतिनिधींना कार्यक्रमात दुय्यम स्थान'
जव्हार, जितेंद्र मोरघा :
जव्हार मधील प्रगती प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या राज्यपाल यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात प्रोटोकॉल टाळून स्थानिक आमदारांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी केला आहे. जव्हार येथे आज प्रगती प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी उपस्थिती लावली होती. मात्र या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या स्थानिक आमदार सुनील भुसारा, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना प्रेक्षकांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेत बसवल्याने स्थानिक आदिवासी लोकप्रतिनिधींचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप आमदार भुसारा यांनी केला आहे.

No comments:
Post a Comment