जळगाव, अखलाख देशमुख, दि ६ : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी जिल्हा शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. यासाठी आज दि.६ रोजी मनपा इमारतीपासून ते शहर पोलीस स्थानकापर्यंत पायी जात पालकमंत्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी शिवसेना कडून करण्यात आली.
यावेळेस शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्रीताई महाजन, वैशालीताई सूर्यवंशी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, मंगला बारी यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे व महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment