औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ०६ : शहरात अनेक MIDC आहेत येथे लाखो कंत्राटी कामगार काम करतात, काही दिवसापूर्वी ओडीसा सरकारने कंत्राटी कामगार पद्धत बंद करून सर्व कामगारांना पर्मनन्ट करण्याचा निर्णय घेतला होता, या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील कामगारांना देखील असाच न्याय मिळवून द्यावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना औरंगाबाद शाखेच्या वतीने कामगार मंत्री सुरेश खाडे यांना निवेदन देण्यात आलेले आहे.
या अगोदर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी देखील महाराष्ट्रातील कामगारांबाबत पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केलेले आहे
आज निवेदन देताना मनसे राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, प्रशांत जोशी, राहुल पाटील, सुरेंद्र वाडेकर, आकाश मिसाळ, विशाल बोंगाणे, विशाल बैद, विक्रमसिंग परदेसी, संदीप आरखं, प्रतीक गायकवाड, विजय गंगावणे, किरण जोगदंड, विकी जाधव, अशोक पवार, दीपक शेजुळ, सारंग पवार, अमित ठाकूर , विवेक जोशी, जय वावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment