Wednesday, 9 November 2022

'पु. ल. अकादमी'तील अधिकाऱ्याच्या गलथान कारभारामुळे नाराजी !

'पु. ल. अकादमी'तील अधिकाऱ्याच्या गलथान कारभारामुळे नाराजी !


मुंबई, गुरूदत्त वाकदेकर : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनापासून साजऱ्या होणाऱ्या पुलोत्सव परंपरेला यंदा अकादमीच्या गलथान कारभारामुळे खंड पडला. त्याचा मोठा फटका राज्यातील शेकडो कलावंतांना बसला आहे. पुलोत्सवासाठी स्वतःच्या प्रयोगाच्या तारखा राखून ठेवणाऱ्या तसेच त्याची तालीम करीत असलेल्या लोककलावंतांमध्ये या महोत्सवाच्या तारखा अचानक पुढे ढकलल्यामुळे मोठी नाराजी पसरली आहे. एका अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळेच असा गोंधळ झाल्याची चर्चा अकादमीत आहे. पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनापासून साजरा होणारा पुलोत्सव म्हणजे चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य आणि लोककलावंतांचा जलसा असे समीकरण आहे. पुलंच्या नावाने सन्मान आणि सादरीकरणाची संधी, नवनवीन कल्पनांचे व्यासपीठ आणि नव्या कलाकारांना ओळख देणारा म्हणून या महोत्सवाचा लौकिक आहे. यंदा सरकारकडून सण सोहळे मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. पुलोत्सव मोठ्या दणक्यात साजरा होईल अशी चर्चा होती. मात्र, यंदा कोणतीही पूर्वकल्पना न देता या उत्सवाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अकादमीत फोन केल्यास कोणीही उपलब्ध नव्हते. त्यामुळे कलावंत अजून संतापले होते. कलावंतांचे नियोजन गडबडलेले दिसले. याला नेमके कोण जबाबदार आहे, याचा विचार शासनाने करावा असे म्हणणे लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे यांचे आहे.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...