Wednesday, 9 November 2022

महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायतीत पतीने हस्तक्षेप केल्यास सरपंचपद बरखास्तीचा बीडिओचा इशारा !

महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायतीत पतीने हस्तक्षेप केल्यास सरपंचपद बरखास्तीचा बीडिओचा इशारा !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीवर महिला सरपंच आहेत,त्या ग्रामपंचायतीत त्यांचे पती मोठ्या प्रमाणात कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचे निर्दशनास आल्याने यापुढे अशी तक्रार आल्यास त्या महिलेचे सरपंच पद रद्द करण्याचा कडक इशारा कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी आमदार किसन कथोरे यांच्या समक्ष दिल्याने आता या पतीपरमेश्वरांचे धाबे दणाणले आहेत.


महिला सक्षमीकरण,तसेच महिलांना समानसंधी या धोरणातंर्गत राजकारणात महिलांना संधी देण्यात आली ,परंतू आजही जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत मध्ये त्यांचे पती, निकटवर्तीय मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत आहेत, निवडून आलेल्या पदाधिका-यांनी/सरपंचानी कार्यालयीन कामे स्वत:करणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही, 


म्हणून शासनाने ६ जुलै २००६ मध्ये शासकिय आदेश काढले ,तरीही हे प्रकार थांबण्याचे नाव घेईना, कल्याण तालुक्यात ४६ ग्रामपंचायती असून यामधील जवळपास २०/२५ ग्रामपंचायतीवर महिला सरपंच आहेत, यामध्ये गोवेली, वडवली, शिरढोण, राया ओझर्ली, म्हसकळ, चवरे, पोई, वासुद्री, बापसई, रुंदे, कुंदे, आपटी मांजर्ली, रायते, नडगाव, निबवली, मानिवली, म्हारळ, वरप, कांबा, वेहळे, बेहरे, फळेगाव, उशीद आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.


त्यामळे नुकतीच कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान याचा टप्पा क्रंमाक दोन ची तालुका स्तरीय सभा आ. किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली सपन्न झाली, यावेळी कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी उपस्तित सरपंच व ग्रामसेवक यांच्या सभेत इशारा दिला की, ज्या ग्रामपंचायतीचे महिला सरपंच आहेत, तिथे कार्यालयात त्यांचे पती व निकटवर्तीय हस्तक्षेप करतात, त्यामुळे असे आढळून आल्यास त्या महिला सरपंचाचे पद मुंबई ग्रामपंचायत अधिनियम१९५८ मधील कलम ३९(१) अन्वये, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना गैरवर्तूणूकबद्दल पदावरून दूर करता येईल असा इशाराच दिला, त्यामुळे या आयत्यावर कोयता, होणा-या पतीपरमेश्वराना चाप बसेल असे वाटते.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...