Wednesday, 9 November 2022

आदित्य ठाकरे यांनी केले आंतरराष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू वैदेही संजय लोहियाचे अभिनंदन व शुभेच्छा !

आदित्य ठाकरे यांनी केले आंतरराष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू वैदेही संजय लोहियाचे अभिनंदन व शुभेच्छा !


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि : ९ नोव्हेंबर.

राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय तलवार बाजी खेळात निपुण असलेल्या औरंगाबादची वैदेही संजय लोहिया हिचे आज (८ नोव्हेंबर) शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी पाठीवर कौतुकाची थाप देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वैदेही लोहिया हिला लहानपणापासूनच तलवारबाजीची आवड होती. आज ती १७ वर्षाची असून साई एनसीओई येथे प्रशिक्षक श्रेया चिब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे, वैदेहीने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदीप्यमान यश मिळवले आहे याची दखल घेत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे व राज्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज वैदेही ची भेट घेऊन तीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नाव : वैदेही संजय लोहिया 
*कार्यप्रदर्शन* 

*1)* 6 ऑक्टो 22 ते 13 टीजी 22 ऑक्टो आशियाई अंडर-23 तलवारबाजी चॅम्पियनशिप (रँक: 20)कुवैत
 *2* )24 फेब्रुवारी 22 ते 03 मार्च 22 - आशियाई कॅडेट आणि ज्युनियर फेंसिंग चॅम्पियनशिप ( रँक: IND : 16 , टीम : 3) उझबेकिस्तान 
*3* )23 ऑक्टोबर 2018 ते 28 ऑक्टोबर 2018- आशियाई अंडर-23 फेन्सिंग चॅम्पियनशिप (रँक: 36) बँकॉक, थायलंड
 *४)* २५ डिसेंबर ते २८ डिसेंबर 29वी ज्युनियर राष्ट्रीय तलवारबाजी चॅम्पियनशिप (रँक: IND: 6वी, टीम: 2रा)सोनीपत 
*5)29* जुलै ते 2 जुलै 2022 30वी ज्युनियर राष्ट्रीय तलवारबाजी चॅम्पियनशिप (रँक: IND: 6वी, टीम: 3री) कटक
 *6* )13 मार्च ते 16 मार्च 22 32 वी वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा (रँक: टीम: कांस्य) अमृतसर
 *7)* 19 ते 21 मार्च 2022 31वी वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी चॅम्पियनशिप (रँक: टीम: 3) उत्तराखंड
 *8* )9 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2019 64वी SFFI (टीम: गोल्ड, इंड: गोल्ड) नाशिक 
*9*) 7 जानेवारी ते 11 जानेवारी 2017 62 वी एसजीएफआय (रँक: टीम: 2) नालगोंडा

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...