Wednesday, 9 November 2022

औरंगाबाद येथील कर्करोग रुग्णालयास स्व. विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा ठराव मंजुर !

औरंगाबाद येथील कर्करोग रुग्णालयास स्व. विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा ठराव मंजुर ! 


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ०९ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. 

राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांनी औरंगाबाद येथे शासकीय कर्करोग रुग्णालय (कॅन्सर हॉस्पिटल) सुरू झाले. त्यामुळे या रुग्णालयास स्व. विलासराव देशमुख यांचे नाव द्यावे, असा ठराव या बैठकीत इकबाल सिंग गिल यांनी मांडला व त्या ठरावाला प्रविण शिंदे आणि प्रमोद ठेंगडे यांनी अनुमोदन दिले समितीच्या सर्व सदस्यांनी हा ठराव एकमताने मंजूर केला. 

मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ आदी ठिकाणाहून कर्करोगाचे रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. सदरील रुग्णालय कर्करोगाच्या रुग्णांसाठी आता आशेचा किरण ठरत आहे....

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...