Saturday, 5 November 2022

औरंगाबादमध्ये कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या खताला राज्यात मागणी !

औरंगाबादमध्ये कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या खताला राज्यात मागणी !


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ०५ : औरंगाबाद शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून गेल्या तीन वर्षात तब्बल २५ हजार टन खताची निर्मिती होत असून शहरातील शेतकऱ्यांसोबतच राज्यभरातील शेतकऱ्यांकडून या खताला मागणी आहे. औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे चिखलठणा, पडेगाव, व कांचनवाडी अशा तीन ठिकाणी प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पाद्वारे दररोज १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. यातून २०१९ पासून आतापर्यंत २५ हजार टन खताची निर्मिती करण्यात आली आहे.

चिखलठणा, पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्रातून जुलै महिन्यापर्यंत ८ हजार ५५ टन सुका कचरा अंबुजा सिमेंट व सोशल लॅबला देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांकडून मागणी

जैविक खत स्वस्त व परिणामकारक असल्याने मराठवाडा तसेच राज्यातील शेतकऱ्यांकडून या खताला मोठी मागणी आहे. हे खत दिड हजार रुपये टन या दराने आरसीएफ, जय किसान व अजित सीड्स या कंपन्यांना विक्री केली जाते.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...